स्त्री समाधानी केव्हा असते.? पती दररोज ही गोष्ट अशा पद्धतीने करत असेल तर ती पूर्णपणे समाधानी राहते..

लाईफ स्टाइल

मित्रांनो, स्त्रियांना नेहमी हे वाक्य ऐकवल जात कितीही करा तुझ मन काही भरत नाही, तुझं आपलं नेहमी चालूच असत. माझ्यासाठी कधी हे केलं का ? ते केलं का ? तू कधीच समाधानी नसते. पण मित्रांनो असं नाही ओ.. स्त्री समाधानी असते जेव्हा तिला तिच्या मनासारखा जोडीदार मिळतो.

स्त्री समाधानी असते जेव्हा रात्री बाळ जागे होते, रडू लागते आणि तेवढ्यात नवरा म्हणतो दे मी घेतो त्याला.. तू झोप. स्त्री समाधानी असते जेव्हा तिची मुले शाळेत निबंध लिहितात माय बेस्ट फ्रेंड माय मॉम and डॅड असं लिहितात.

स्त्री समाधानी असते जेव्हा चार लोकांसमोर तिचं कौतुक नवरा मोठ्या अभिमानाने करतो. स्त्री समाधानी असते जेव्हा तिचा नवरा त्याच्या प्रत्येक यशात तिला सहभागी करून घेतो. स्त्री समाधानी असते जेव्हा तिचा नवरा म्हणतो वा काय चव आहे तुझ्या हाताला.

मुल जेव्हा म्हणतात मम्मा तुझ्यासारखं जेवण कोणीच बनवत नाही ग. स्त्री समाधानी असते तेव्हा जेव्हा नवरा कामावरून येताना सहज एखादा गजरा आणतो. आणि तिच्या केसात अगदी प्रेमाने घालतो. स्त्री समाधानी असते जेव्हा संसाराच्या या घाई गडबडीत सुद्धा नवरा तिला,

एक गुलाब देऊन हळूच कानाजवळ येऊन हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. स्त्री समाधानी असते जेव्हा सासू सासरे अभिमानाने सांगतात या आमच्या सुनबाई आहेत, सुनबाई नाहीच ओ हि तर आमची लेक आहे. स्त्री समाधानी असते जेव्हा सून म्हणते आई छान दिसते हं हि साडी तुम्हाला.

स्त्री समाधानी असते जेव्हा नातवंडही आजी आजोबांनाही आपल्याबरोबर, फिरायला घेऊन चला असा आई बाबांकडे लाडिक हट्ट करतात. स्त्री समाधानी असते जेव्हा आई जेवलीस का ? बाबा कुठे आहेत ग ते जेवले का असे विचारतो.

स्त्री समाधानी असते जेव्हा चौकोनी कुटुंबात आई बाबांना महत्वाच स्थान असत. स्त्री समाधानी असते जेव्हा तिला घरातील प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी केलं जाते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्त्री समाधानी तेव्हा होते जेव्हा, तिला तिच्या नवऱ्याचे हवे तसे प्रेम मिळते. स्त्री मग ती कोणत्याही वयाची असुदे.

तिच्यात प्रेम, माया, क्षमा सगळ असते तिला दुर्लक्षित करू नका. ती तुमच्या घरची लक्ष्मीच आहे. तिला तिचं स्थान द्या. तिला दुर्लक्षित केले की ती भां’डायला उठते. ती कधी उध्दट देखील होते. पण जेव्हा जेव्हा तिच्या मनाविरुद्ध चुकीचे घडत आहे त्या त्या वेळी तिच्यातील शक्तीने ज न्म घेतला आहे.

तिला तिचं स्थान द्या छोट्या-छोट्या गोष्टीत पण सुख मानणारी हि एक निसर्गाची सुंदर कलाकृती आहे. ती एक तुमच्या रथाचे चाक आहे. मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक,

कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच दररोज नव-नवीन लेख वाचण्यासाठी आत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.