2 भावांच्या उत्तम कल्पना आणि नियोजनामुळे उभी केली 2600 कोटी रुपयांची कंपनी तेही कोणत्याही गुंतवणुकीशिवाय…

लाईफ स्टाइल

कोणताही व्यवसाय जर आपल्याला सुरू करायचा असेल तर त्यासाठी भांडवली गुंतवणूक ही अत्यंत आवश्यक असते. कागदावर छापलेली प्रत्येक व्यवसाय कल्पना किंवा त्याचे मॉडेल हे अतिशय आकर्षक दिसते. मात्र त्या गोष्टीचे वास्तवात रुपांतर करण्यासाठी आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणूनच गुंतवणूकदारांना कमीत कमी धोका पत्करायचा आहे. आणि जर अशा कोणत्या स्थितीत एखाद्या स्टार्टअपने जर स्वत:ला सिद्ध केले, तर गुंतवणूकदारांसाठी भांडवली गुंतवणुकीचा मार्गही देखील सुकर होतो.

आणि पुढे ह्या काही गोष्टींना लक्षात घेऊन अमित जैन आणि अनुराग जैन यांनी CarDekho.com हे सुरू केले. ‘कारदेखो’ या च्या सुरुवातीला त्यांनी खास रणनीती चा अवलंब केला. ज्यामध्ये त्याने गुंतवणूकदारांना थेट गुंतवणूक करण्यापूर्वी कमाईच्या सर्व पर्यायांचे नियोजन केले. त्यामुळे आज त्यांची कंपनी ही 400 दशलक्ष डॉलर्स इतकी झाली आहे. त्याने प्रथम आपले पैसे येण्याचा मार्ग मोकळा केला आणि नंतर त्यांनी सर्व गुंतवणूकदारांना त्यांचे भांडवल गुंतवण्या साठी आमंत्रित केले होते.

सुरुवातीला प्रकल्प सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे भांडवल होते पण त्यांना एक मोठा ब्रँड म्हणून स्थापित आणि मार्केट करण्यासाठी गुंतवणूकदारांकडून आवश्यक गुंतवणूक मिळाली. कारदेखो लाँच झाल्यानंतर किमान पाच वर्षांनी 2013 मध्ये पहिली भांडवली गुंतवणूक करण्यात आली. त्यानंतर अनेक गुंतवणूकदार त्यांच्या कंपन्यांवर अवलंबून राहिले आणि तेव्हापासून रतन टाटा, शिकोया कॅपिटल, गुगल कॅपिटल, हाउसहिल कॅपिटल, टिबोर्न कॅपिटल, टाइम्स इंटरनेट, एचडीएफसी. बँकेकडून $80 दशलक्ष ची गुंतवणूक त्यांना मिळाली.

अमित आणि अनुराग हे दोघेही आयआयटी दिल्लीचे पदवीधर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करत होते. अमितने ट्रायलॉजीमध्ये 7 वर्षे आणि अनुरागने 5 वर्षे साबरे हॉलिडेमध्ये काम केले. वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन्ही भाऊ त्यांचे काम सोडून पुन्हाजयपूर येथील त्यांच्या घरी आले होते. मात्र, दोघांनीही कौटुंबिक दागिन्यांचा व्यवसाय सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. बंधूंनी गिरनारसॉफ्ट नावाची माहिती तंत्रज्ञान आउटसोर्सिंग कंपनी स्थापन केली. सुरुवातीला त्यांचे ऑफिस हे त्यांचे बेडरूम होते.

खूप प्रयत्नांनंतर, त्याला त्याचा पहिला ग्राहक मिळाला आणि 50,000 रुपयांची डील निश्चित झाली, जी मानक किंमतीपेक्षा खूपच कमी होती. तरीही त्यांनी ते काम करायचे थांबवले नाही आणि नंतर ते हळूहळू ते एका ग्राहकाकडून दुसऱ्या ग्राहकाकडे गेले. त्यांनी 1 एप्रिल 2007 रोजी त्यांचा पहिला कर्मचारी सदस्य नियुक्त केला आणि एका वर्षातच ते 40 सदस्यीय संघात वाढले. त्यानंतर आता त्यांच्याकडे काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी पुरेसे भांडवल आहे.

खूप चर्चा आणि चिंतनानंतर दोन्ही भावांनी २००८ मध्ये दिल्ली ऑटो कार एक्स्पो-२००८ ला भेट दिली आणि तिथून ‘करदेखो’चा प्रवास सुरू झाला. त्यानंतर त्या दोघांनी एक असा प्लॅटफॉर्म तयार करण्याचा निर्णय घेतला जिथून कार घेणं सोपं होईल. दोन्ही भावांनी तेथून पुढे त्यांनी कारची सर्व माहितीपत्रके गोळा करून २००८ मध्ये त्यांची कारदेखो ही नवीन साइट सुरू केली. कारदेखो’ ही एक वेबसाइट आहे.

आणि ह्या द्वारे युजर्स ला कारची किंमत, तसेच त्या कार चा निर्माता, त्याचे मॉडेल आणि त्याची इतर काही वैशिष्ट्ये याबद्दल व्यवस्थित माहिती मिळू शकते. आणि त्या सोबतच त्या कारची एकाच वेळी चार कार सोबत तुलना करता येईल. अमित आणि अनुराग यां दोघानाही त्यांच्या सुरुवातीला अनेक कठीण आव्हानांचा भरपूर सामना करावा लागला. कार डीलर्सना तयार करणे हे काही सोपे नव्हते.

त्या वेळी, कार डीलर्स फक्त त्यांच्या पारंपारिक प्रचार चॅनेल वापरत होते. त्यांना डिजिटल माध्यमांच्या क्षमतेबद्दल पटवून देणे कठीण होते. पण ज्यावेळी त्या कार डीलर्सच्या असे लक्षात आले की कारदेखो या मध्ये सामील झाल्या नंतर त्यांच्या शोरूम मधील ग्राहकांची संख्या ही अधिक वाढली आहे, त्यांनतर अमित आणि अनुरागच्या या चॅनेलद्वारे अधिकाधिक लोक त्यांच्या सोबत सामील झाले.

गिरनार सॉफ्टचे ‘कारदेखो’ हे प्राथमिक एकक आहे. यासोबतच जैन बांधवांनी ‘बाईक देखो’, त्यानंतर ‘ प्राईसदेखो’, सोबतच ‘टायर देखो’, आणि ‘कॉलेज देखो’ यांसारखे अनेक यशस्वी ई-कॉमर्स युनिट देखील सुरू केले आहेत. जयपूरस्थित असलेल्या या कंपनीचे भारतातील ७ वेगवेगळ्या शहरांमध्ये कार्यालये स्थित आहेत. 2,000 कर्मचाऱ्यांसह, 35 दशलक्ष ग्राहक दरमहा या वेबसाइटला भेट देत असतात.

या कंपनीला पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेता यावं यासाठी कार देखो ने परदेशात देखील त्यांच्या शाखा सुरू केल्या. अमित जैन आणि अनुराग जैन यांच्या या उपक्रमासाठी डिजिटल एम्पॉवरमेंट फाऊंडेशन यांच्या कडून साल 2016 साली व्यवसाय आणि वाणिज्य श्रेणीतील सर्वोत्कृष्ट कंपनीचा पुरस्कार मिळाला आहे.