स्त्री कधी पुर्णपणे समाधानी होते ? फक्त हि एकच गोष्ट तिला मनभरून हवी असते.. नवरा-बायको दोघांनीही एकदा बघाच..

लाईफ स्टाइल

मित्रांनो, बायकांना नेहमीच हे वाक्य बऱ्याचवेळा सिवले जात असते की काहीही केले तरी सुद्धा तुझे मन हे मात्र कशानेच भरत नाही, तुझं तर नेहमीच काहीना काही चालूच असते. तू माझ्यासाठी कधी हे केले आहेस का? ते कधी केले का ? तु तर कधीच समाधानी नसते. पण मित्रांनो असे नाही. आपल्या मनासारखा जोडीदार मिळाल्याने स्त्री फार समाधानी असते.

रात्री मूल उठल्यावर जेव्हा रडायला लागते आणि त्याचवेळी नवरा उठून जेव्हा तिला म्हणतो की मी घेतो त्याला तू झोपी जा… त्यावेळी ती स्त्री समाधानाने भरून पावलेली असते. एक स्त्री समाधानी असते जेव्हा तिची मुले शाळेत माझे बेस्ट फ्रेंड माय मॉम आणि डॅड सारखे निबंध लिहितात. जेव्हा तिचा नवरा चार लोकांसमोर अभिमानाने तिची प्रशंसा करतो तेव्हा स्त्री समाधानी असते.

जेव्हा तिचा नवरा तिच्या प्रत्येक यशात सहभागी होतो तेव्हा स्त्री समाधानी असते. एक स्त्री समाधानी असते जेव्हा तिचा नवरा असे म्हणतो की व्वा काय चव आहे तुझ्या हाताला, तुझ्यासारख जेवण कोणीच बनवू शकत नाही. मुलं जेव्हा म्हणतात की मम्मा तू बनवते तसं जेवण कोणीच शिजवत नाही ग, त्यावेळी सुद्धा ती स्त्री समाधानी असते.

एक स्त्री समाधानी असते जेव्हा तिचा नवरा कामावरून घरी जाताना सहज एखादा गजरा तिच्यासाठी आठवणीने आणतो. आणि तिच्या केसांना पण प्रेमाने तो गजरा लाऊन देतो. त्यांच्या ह्या व्यस्त संसारात देखील ज्यावेळी तिचा नवरा तिला गुलाब देतो आणि त्यानंतर तिच्या कानाजवळ जाऊन जेव्हा तिला हळूच व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा देत असतो तेव्हा ती स्त्री अधिक समाधानी होते.

स्त्री ही समाधानी होत असते जेव्हा तिची सासू अभिमानाने सांगते की ती आमची सून नाही काही, आम्ही मुलगीच आहे. “आई, ही साडी तुम्हाला फार छान दिसते हा” असे ज्यावेळी सून तिच्या सासूला म्हणते त्या वेळी ती बाई अधिक समाधानी होत असते. जेव्हा नातवंडं आपल्या आजी आजोबांना सुद्धा आपल्यासोबत फिरायला नेण्यासाठी आपल्या आई बाबांकडे हट्ट करत असतात तेव्हा ती स्त्री समाधानी असते.

स्त्री समाधानी असते ज्यावेळी मुल विचारतात आई जेवली का? बाबा कुठे आहेत आणि जेवले का ते. ज्या ज्या वेळेस कुटुंबामधे त्यांच्या पालकांना महत्त्वाचे स्थान दिले गेलेले असते तेव्हा त्यावेळी एक स्त्री अत्यंत समाधानी होत असते. घरातील प्रत्येक गोष्टीत ज्यावेळी स्त्रीला सहभागी केलेले असते तेव्हा ती स्त्री स्वतःला फार समाधानी मानत असते.

आणि या गोष्टींपेक्षा देखील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की प्रत्येक स्त्रीला तिच्या नवऱ्याकडून ज्यावेळी तिला हवं तसं प्रेम मिळत असते, त्यानंतर ते मिळाल्यावर ती स्त्री अधिक समाधानी असते. मग ती स्त्री कोणत्याही वयाची का असेना, परंतु तीच्याकडे प्रेम आहे, आपुलकी आहे, क्षमा आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका.

ती स्त्री तुमच्या घरची लक्ष्मी आहे. तिला तिची जागा द्या. तीच्याकडे दुर्लक्ष झाले की मग ती स्त्री भांडायला उठते. ती काही वेळा उद्धट देखील होत असते. पण प्रत्येक वेळी जेव्हा त्या स्त्री च्या मनाच्या विरोधात काहीतरी गडबड होते त्या वेळी मात्र तिच्यातली शक्ती जन्म घेत असते. तिला तिची जागा द्या, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद आणि सुख मनात असलेली ही निसर्गाची एक सुंदर कृती आहे.

हे तुमच्या संसाराच्या रथाचे एक चाक आहे, त्याला अवश्य जपा. मित्रांनो, जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही ही महत्त्वाची माहिती मिळू शकेल. असे रोज नवनवीन लेख वाचण्यासाठी आत्ताच आमचे पेज लाईक करा.