शर्यतीमधील लंगड्या घोड्याला का मारले जातं ? घोड्यांना बरं करण्याऐवजी घोड्याचे मालक त्यांना मारून का टाकतात ? तुम्हाला बघून धक्का बसेल…

लाईफ स्टाइल

मित्रांनो, घोड्याचा उपयोग तुम्हाला माहित असेलच. अगदी नवरदेवाला वरातीत मिरवण्यापासून ते अगदी भारीतील भारी ओझे वाहून नेण्यासाठी घोड्यांचा वापर हा केला जातो. काही जण त्याचा वापर रेसकोर्सवर घोडेस्वारीसाठी करतात, तर काहीजण टांगा या वर घोडेस्वारीसाठी करतात. घोडा हा एक असा प्राणी आहे ज्याचे आरोग्य आणि स्वरूप हे त्याची काळजी कशी घेतली जात असते यावर थेट आणि पूर्णपणे अवलंबून असते.

निसर्गाने प्रत्येक जीवाला एक प्रकारची शरीररचना दिली आहे. या संरचनेप्रमाणे प्रत्येकजण त्याचे कार्य तो करू शकत असतो. घोडा का बसत नाही हे समजून घेण्यापूर्वी, आपण इतर दोन पायांच्या सजीवांची शरीररचना समजून घेऊ. आपण का आणि कसे बसू शकतो? प्रथम तुमची शरीररचना तपासा. तर आपल्याला आपले पाय गुडघ्यातून टेकवायला सहज जमतात म्हणून आपण बसू शकत असतो.

तुम्ही जर नीट बघितले तर तुम्हाला दिसेल की गाय, बैल किंवा कुत्रा बसलेला दिसला असेल किंवा त्यांना जर ते त्यांचे पाय हे गुडघ्यात वाकवून बसू शकत असतात. घोड्याच्या पायांची रचना जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला दिसेल की त्याचे पाय गुडघ्यात वाकू शकत नाहीत. कारण तिथे निसर्गतः च सांधे दिलेले नाही आहेत. आणि हा सांधा असला तरी तो बिजागरीचा नसतो, त्यामुळे तो त्याच्या पायाचे हाड हे पुढे मागे वाकवू शकत नाही.

घोडा पाय वाकवू शकत नाही, म्हणून बसू देखील शकत नाही. त्यामुळे घोड्यांच्या शर्यती आणि त्यामध्ये धावणाऱ्या घोड्याला आणि त्यांच्या पायांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. पण शर्यतीचा घोडा जोपर्यंत धावपट्टीवर असतो तोपर्यंत त्याची किंमत असते, पण त्याचा पाय तुटल्यावर मात्र त्याला मारले जाते. हजारो जखमी, तुटलेले पाय असलेले घोडे हे दरवर्षी मारले जात असतात.

असा प्रश्न आता तुमच्या मनात उपस्थित होत आहे ना? कि घोडे मालक घोड्यांना व्यवस्थित बरे करण्याऐवजी त्यांना का मारतात, तर आज आपण याच प्रश्नाचे नेमके उत्तर जाणून घेणार आहोत. हा सगळा प्रकार जरी तुम्हाला अमानवीय वाटत असला तरी देखील विज्ञान सांगते की ते फक्त घोड्यांसाठीच अतिशय फायदेशीर आहे.

आता कसे ते समजून घेऊ. वस्तुस्थिती अशी आहे की माणसाप्रमाणे घोड्याला तुटलेल्या पायावर दीर्घकाळ वागवले किंवा त्यावर उपचार केले जाऊ शकत नाही. या उपचारादरम्यान घोडे कुत्र्यांप्रमाणे 3 पायांवर चालू शकत नाहीत. त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहे कि त्यांचे सर्व वजन उचलण्यासाठी त्यांच्या चार ही पाय सक्षम असणे.

किरकोळ दुखापतींसाठी घोड्यांवर एक दिवसाचा उपचार केले जाऊ शकतात, परंतु मोठ्या जखमांवर उपचार केले जाऊ शकत नाहीत. कारण तज्ज्ञांच्या असे मत आहे कि घोडे फार काळ उपचार सहन करु शकत नाहीत किंवा दीर्घकाळ उपचार सहन करण्याची ताकद त्यांच्यात नसते. तथापि, दुसरे दिलेले कारण म्हणजे रेसच्या घोड्याची असणारी जटिल शरीररचना.

इतर घोड्यांपेक्षा रेसचा घोडा हा नक्कीच वेगळा असतो. त्याच्या शरीरात 205 हाडे असतात आणि त्यापैकी 80 पायात आहेत. प्रचंड वेगाने फिरण्यासाठीच ही हाडे तयार झालेली आहेत. सुमारे 500 किलो घोड्याचे वजन वाहून नेण्यासाठी ही हाडे जबाबदार आहेत. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे कि ही हाडे त्या मानाने वजनाने फार हलकी असतात.

या कारणास्तव, म्हणूनच घोड्याचा पाय जेव्हा तुटतो तेव्हा ही हाडे पुन्हा जोडणे कठीण होते. या सर्व गोष्ट घोड्यांच्या बाबतीत लक्षात ठेवून घोडा मारणे हाच पर्याय उरतो. होय, बरोबर आहे मित्रांनो, घोड्याचा मृ’त्यू, कारण कोणताही दुसरा पर्याय त्यावेळी शिल्लक राहत नाही. तसेच घोड्याच्या मालका द्वारे घोडा मारण्याचा निर्णय हा घेतला जात नाही. पशुवैद्यकावर हा निर्णय अवलंबून आहे.

घोडा कधीच बरा होऊ शकत नाही किंवा त्याच्या उपचारांना खूप वेळ लागेल याची खात्री केली जाते मग हा निर्णय घेतला जातो. एकदा निर्णय घेतला की लगेच घोड्याचा जीव घेतला जातो. भारतीय लष्कराच्या वर्तुळातील निवृत्त कुत्र्यांचेही असेच घडते. मात्र निवृत्त कुत्र्यांच्या हत्येमागे वेगळेच तर्क आहे.