लव मॅरेज झाले… नंतर मुलगा झाला पण नंतर समोर आले धक्कादायक सत्य… मुलीने रात्री दुसर्‍या सोबत…

लाईफ स्टाइल

स्नेहा आणि अमित चे नुकतेच लग्न झाले होते. कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून दोघे एकत्रच होते. पुढे जॉब सुद्धा त्याच ऑफिस मध्ये झाल्यामुळे दोघेही एकमेकांना चांगले ओळखू लागले. घरच्यांनी पण या जोडप्याचे मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिले होते. हे जोडपे त्यांच्या लग्नाच्या नंतरचे सुंदर दिवस एन्जॉय करत होते. काही दिवसांनी त्यांनी पुन्हा ऑफिस जॉईन केले होते. नवोदितांचे नऊ दिवस संपले आणि घरात कुरबुर सुरू झाली.

फक्त एकुलतीएक लेक असल्याने स्नेहाचे थोडे जास्त लाड झाले होते तिच्या घरी, तिला घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळायची सवय नव्हती. त्यामुळे अमित ची आई आणि स्नेहा यांच्यात या ना त्या कारणावरून सतत भांडणे होत होती. अमित कधीच दोघांमध्ये पडला नाही, चुकून पडला तर दोन्हीकडून त्याला ऐकावे लागत होते. त्यामुळे आधी तो स्नेहाला समजावत असे, पण नंतर त्या कारणाने त्यांच्यातच वाद होऊ लागल्याने त्याने ते बोलणे सोडून दिले.

सासू आणि सून आणि त्यांची सारखी कुरबुर हे असेच रोज चालू राहिले. पण बाळाच्या चाहुलीने त्याला थोडा दिलासा दिला. अमित सुद्धा स्नेहा ची अधिक काळजी घेऊ लागला. तसेच राजेशला चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची संधी मिळाली, ज्याचा सर्वांना आनंद झाला. नुकताच त्यांच्या घरी बाळराजाचा जन्म झाला. त्यामुळे प्रत्येकजण अधिक आनंदी होता. मुलाच्या दुडू दुडू ने घरातील सदस्यांची मने जिंकली.

लहान राजकुमाराने संपूर्ण घरावर राज्य केले. मात्र, त्या बाळाच्या संगोपनात त्याच्या आई-वडिलांना मदत करणारे कोणी नव्हते. स्नेहा घरातील सगळी कामे करून, मुलाची काळजी घेत थकून जायची. अमित सकाळी लवकर निघायचा आणि रात्री उशिरा घरी यायचा. त्यामुळे त्याच्याकडून मदतीची अपेक्षा करणे चुकीचे होते. सासू घरी असली तरी मगच मनात विचार येतो की मुलाची काळजी घेण्याचं काम त्याही करत असतात. अखेर स्नेहा ने सासर च्या घरापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

तिने अमित ला सुद्धा तेच सांगितले. अमितने पण तिला साथ दिली आणि ते दोघेही वेगळे राहू लागले. ती तिच्या आई-वडिलांच्या घराजवळच्या नवीन घरात राहायला गेली. त्यामुळे तिला तिच्या पालकांकडून मदत मिळत राहिली. राजवीर त्यांच्यासोबत छान खेळायचा. त्यामुळे सगळेच व्यवस्थित चालू झाल्याने सगळ्या चिंता मिटल्या होत्या. असे म्हणतात की प्रेम लांब राहिल्याने अजून वाढते.

त्यांच्याबाबतीतही तसेच झाले. सासू नीट वागू लागली, घरी येऊन सगळ्यांशी बोलू लागली. सगळं कसं गोड गुलाबी सुरू झाल राहिलं. कोविडमुळे दोघांनीही घरून काम करायला सुरुवात केली. त्यामुळे दोघेही एकमेकांना वेळ देऊ शकले, आई-वडील दोघेही घरी असल्याने राजवीर खूप खुश होता. तो सुद्धा त्यांच्याकडे व्यवस्थित राहत होता. चांगले दिवस फार काळ टिकत नाहीत. कोरोनामुळे सर्वत्र कामाच्या ठिकाणी कामगार कपात सुरू केली.

त्यात अमित चे सुद्धा नाव आले होते. बातमी ऐकून तो स्तब्ध झाला. घराचा नवा हप्ता, गाडीचे कर्ज, राजवीरची शाळा, आईवडिलांचा औषधांचा खर्च या विचाराने त्याचे अक्षरश: डोके भनभणु लागले. आणि त्यातच त्यामुळे त्याला दारूचे व्यसन देखील लागले. स्नेहा मात्र त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती, त्याच्या विचित्र वागण्याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती,

पण तिला काहीच समजत नव्हते, एके दिवशी अमित रात्री खूप उशिरा घरी आला, तो पण दारूच्या नशेत होता. पण हे पाहून स्नेहाला त्याचा अतिशय राग आला. त्या रात्री स्नेहा मात्र अमित ला काहीच बोलली नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र स्नेहा त्याला खूप काही बोलली, पण अमित मात्र तिचं काहीच ऐकत नव्हता, स्वतःच्या वागण्यावर आणि दारूवर त्याचा ताबा नव्हता.

स्नेहा तर घर सोडणार होती आणि निघून जाणार होती. पण त्या आधी शेवटचा एक उपाय म्हणून तिने अमितच्या बहिणीला फोन केला. अमितची बहीण ही त्याच्यापेक्षा चार वर्षांनी मोठी होती. दोन्ही भावंडे सुरुवातीपासूनच एकमेकांचे चांगले मित्र होती. स्वाती त्याला धीर देते आणि शांत राहायला सांगते. दोन दिवसांनी स्वाती म्हणजेच अमित ची मोठी बहीण अचानक अमित च्या घरी त्यांच्यासोबत राहायला आली.

तिला पाहून तर अमित फारच भारावून गेला होता, त्याने तिला घट्ट मिठी मारली आणि रडू लागला, अमित शांत झाल्यावर स्वातीने अमितला विचारले तू का रडतोस? नुकतेच त्याची नोकरी गेल्याचे अमित ने त्यांना सांगितले. हे ऐकून स्वाती आणि स्नेहा दोघींनाही धक्का बसला, पण स्वाती राजेशला धीर देते. असे आधी का सांगितले नाही, असा सवाल सुद्धा त्यांनी त्याला केला. मग तिने तिच्याकडील काही पैसे उधार देऊन अमित ला छोटा व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला.

अमितला सुद्धा त्याच्या बहिणीची ती कल्पना आवडली. त्याने लगेच तसे करण्यास होकार देऊन टाकला. त्याच्या आई-वडिलांनी देखील त्याला यामधे थोडी मदत केली. लवकरच त्याचा नवा व्यवसाय हा चांगलाच भरभराटीला येऊ लागला. त्याची आर्थिक स्थिती सुद्धा या कारणाने पूर्वपदावर आली आणि तो दारूच्या व्यसनातून पूर्णपणे बरा झाला होता. दोघांचा नवा आणि सुखी संसार हा पुन्हा एकदा सुरू झाला होता.