लग्नासाठी मोठ्या बहिणीला बघायला आले आणि पसंत गेली लहान मुलगी पण मोठ्या बहिणी सोबत पुढे जे घडत गेले

लाईफ स्टाइल

सुनंदाबाई आपल्या मुलीची सुवर्णाची वाट बघत हॉलमध्ये चकरा मा रत होत्या. सुवर्णा ऑफिसच्या कामानिमित्त गुजरातला गेली होती. आज रात्रीच्या विमानाने ती परत येणार होती पण अकरा वाजले तरी सुवर्णा यायची काही चिन्हे दिसत नव्हती. अर्ध्या तासापूर्वी सुवर्णाचा सुनंदाबाईंना फोन आला कि, ती विमानतळावर पोचली आहे आणि तिला यायला थोडा उशीर होईल.

त्या या रूममधून त्या बाल्कनी मध्ये चकरा मा रत होत्या. गडबडीने सुवर्णा घरी पोचली. सुनंदाबाई दारातच उभ्या होत्या. आईला हॉलमध्ये पाहून म्हणाली, आई अजून तू झोपली नाहीस ? माझी वाट नको बघत जाऊ ? सुनंदाबाईंना राग अनावर झाला. कुठे होतीस इतका उशीर ? राहुल बरोबरच होतीस ना ? बोलली हो राहुल बरोबर होते आम्ही एकत्र जेवलो घरी निघालो.

सुनंदा बाई म्हणाल्या की लोक तुझ्या मागे काय काय बोलतात. तुला काहीच कसं वाटत नाही ग. आपण या विषयावर उद्या बोलु असं बोलून सुवर्णाने विषय टाळून दिला आणि ती झोपायला गेली. सकाळी सुवर्णा चहा पीत होती. तेव्हा परत तिच्या आईने तोच विषय काढला तुझे असं उशिरा येणे, राहुल बरोबर उशिरापर्यंत बाहेर फिरणं. लोक बोलतात तुझ्याबद्दल मला नको ते प्रश्न विचारतात.

आई मी माझ आयुष्य जगते. लोकांना काय देणं घेणं. सुनंदाबाई तिला समजून सांगू लागल्या. असं बोलून चालत नाही स माजात राहायचं आहे. त्यापेक्षा तू लग्न कर. संगीताला जाऊन दोन वर्षे झाली. लग्न केले तर तोंड बंद होतील. राहुलच्या आणि माझा मनात लग्नाचा विचार नाही. दिवसभराच्या त णावपूर्ण कामातून सुटका झाली की दोघांना एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटतो.

आयुष्यात अशी एक वेळ होती जेव्हा मी लग्नासाठी आतुरतेने वाट पाहत होते. त्या वयात लग्नाशिवाय आयुष्यात काहीच नाही हे सत्य तू मला आणि बबीताला सांगितले. दादाला व भैय्याला तू चांगलं शिक्षण घ्यायला प्रोत्साहित केलं. पण आमच्या समोर फक्त लग्नाचा प्रस्ताव ठेवला.

मुलगा व त्याच्या घरची मला बघायला आली व मला पसंत न करता त्यांनी बबीताचा हात मागितला. पण तुम्ही मुलाकडच्यांना सांगायला हवं होतं की तुम्ही तुमच्या मोठ्या मुलीच्या लग्नाचा विचार करत होतात. पण तुम्हाला मात्र तुमच्या जबाबदारीतून मोकळ व्हायचं होतं. पण तुमच्या निर्णयाचा माझ्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार कधी केला का ?

बबीता सासरी गेली व थोड्या दिवसात भैय्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी घरापासून तो दूर राहिला. त्याने त्याच्या पसंतीची मुलगी निवडली. मी मात्र वरमाला हातात घेऊन लग्न होण्याची प्रतीक्षा करत बसले. याच्या लग्नानंतर तुम्ही दादाच्या लग्नाची तयारी सुरू केली. दादाची बायको मात्र माझ्या आयुष्यात देवासारखी आली. तिने मला पदवीधर शिक्षणासाठी प्रेरित केली.

त्यानंतर मी मागे वळून पाहिलं नाही. मुंबईसारख्या शहरात लठ्ठ पगाराची नोकरी, स्वतःचे घर हे मिळवण्याच्या नादात लग्नाचा विषय कधी मागे पडला हे कळलच नाही. माझी ही काही स्वप्न होती. माझाही संसार, मुलं असावी. लोकांनी अंदाज लावायला सुरुवात केली काहीतरी अवगुण असेल. कोणी बोललं काही प्रेम प्रकरण असेल ? पण या लोकांच्या बोलण्यात खरेपणा होता का ?

सुनंदा बाई बोलल्या, ते सर्व खोटे होते. पण लोकांची तोंड कुठपर्यंत बंद करणार ना ? किती प्रयत्न केले लग्नासाठी पण सगळी कडून न कार घंटा आली. तुमच्या या नात्याला नाव तरी काय आहे ? प्रत्येक नात्याला नाव असायलाच हवे असे तर नाही ना ? आई आम्ही दोघे समदुःखी आहोत. जेव्हा संगीताला कॅ न्सर झाला तेव्हा मी व राहुल ने तिची खूप सेवा केली.

राहुल आणि मी एकाच ऑफिसमध्ये काम करतो त्यामुळे त्याची आणि माझी ओळख फक्त कामापुरती होती. पण जेव्हा माझी एक दोन कार्यक्रमांमध्ये संगीताशी भेट झाली. तेव्हा आम्ही दोघी खूप चांगल्या मैत्रिणी झालो. तिच्या जाण्याने माझ्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली. त्यावेळी राहुलच्या आणि माझ्यामध्ये एक मैत्रीची वेल फुलायला लागली.

आम्हाला शा रीरिक आकर्षण नाही ना आम्हाला लग्न करायच आहे. आम्ही आपापल्या आयुष्यात स्थिर आहोत. एकमेकांना भेटावसं वाटतं. संगीताबद्दल बोलावसं वाटतं. एकमेकांचा सल्ला घ्यावा फक्त एवढच.. बाकी काही नाही… थोडा विचार करून सुनंदाबाई म्हणाल्या, दोन व्यक्तींमध्ये फक्त मैत्री सुद्धा असू शकते. प्रत्येकाने असा विचार केला पाहिजे नाहीतर उचलली जीभ लावली टाळ्याला असं करू नये.