रामायणातील रावणाच्या पायाखालचा निळा माणूस कोण होता आणि रावण त्याच्या अंगावर पाऊल टाकून का बसत होता?

आध्यात्मिक

रामायण आणि महाभारत यांसारख्या पवित्र धर्मग्रंथांबद्दल आपल्याला जाणून घेण्याची संधी मिळाली आहे यासाठी आपण खूपच भाग्यवान आहोत. महाभारतातील घटना आपल्याला टीव्हीवर दाखवल्या जातात आणि आपण त्या समजून घेतो आणि पाहतो. रामायणाशी संबंधित तशा अनेक कथा आहेत. रामायण ही एक कथा आहे जी प्रत्येकाला पाहायला आणि वाचायला देखील फार आवडत असते.

रामायण आणि महाभारत प्रत्येक हिंदू कुटुंबात वाचले जाते. टीव्हीवरील ‘रामानंद सागर’ यांचा हा शो संपूर्ण भारतात खूप लोकप्रिय झाला असल्याचं आपण सर्वांनीच पाहिलं होत. लॉकडाऊनच्या काळात पुन्हा एकदा रामायण मालिका ही दूरदर्शन वर प्रसारित करण्यात आली होती. आणि या पुन्हा एकदा प्रसारित झालेल्या रामायण मालिकेने टीआरपीचे सर्व अन्य मालिकांचे रेकॉर्ड तोडले होते.

लोकांना रामायणाशी संबंधित अनेक वेगवेगळ्या कथा ऐकायलाही तितक्याच आवडत असतात. त्यामुळे आज आपण सुद्धा अशी एक गोष्ट पाहणार आहोत ज्याबद्दल तुम्हाला माहिती नसेल आणि तुम्ही ती गोष्ट समजल्यानंतर नक्कीच थक्क व्हाल, तर मग ती गोष्ट नेमकी काय आहे, हे अवश्य जाणून घ्या…!

रामायण म्हटलं की आपण रामाचे स्मरण करतो आणि रामासह रावणाचेही स्मरण करतो, कारण रामायणाचे नाव घेतले की आपल्याला प्रभू श्री राम आणि रावण यांच्यात झालेले युद्ध सर्वप्रथम आठवते. रावणाच्या अनेक कथा आहेत आणि तसेच भगवान रामाच्या देखील अनेक कथा आहेत ज्या आपल्याला अजिबात माहित नाही आहेत.

जेव्हाही आपण रामायण पाहिले होते किंवा आजही ते बघतो तेव्हा रावणाच्या सिंहासनाच्या पायाखाली एक माणूस असल्याचे आपल्याला दिसून येतो. त्या माणसाची संपूर्ण त्वचा निळी होती आणि तो पडून होता. असा माणूस रावणाच्या पायाखाली का असतो याचा कधी विचार केला आहे का? रावणाच्या पायाखाली चिरडलेली ही व्यक्ती कोण? चला आज जाणून घेऊया रावणाच्या पायाखालची ती व्यक्ती नेमकी कोण आहे?

रावण हा महान ज्योतिषी होता अशी आख्यायिका आहे. रावणाने नऊ ग्रह ताब्यात घेतले होते. ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रह महत्त्वाचे योगदान देतात आणि त्यांच्या आधारे भविष्य वर्तवले जाते. पौराणिक कथेनुसार, रावणाने केवळ देवतांनाच नव्हे तर नऊ ग्रहांचीही हानी केली होती. रावणाने आपल्या मुलाच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती नियंत्रित केली. या नऊ ग्रहांपैकी फक्त शनी निळा होता.

रावण ज्योतिषशास्त्रात अत्यंत निपुण होता. मेघनादाचा जन्म झाला तेव्हा रावणाने सर्व ग्रह अशा प्रकारे ठेवले की त्याचा मुलगा कायमस्वरूपी अमर होईल. पण शनि वारंवार आपले स्थान बदलण्याचा प्रयत्न करत होता. आणि त्यामुळेच रावणाचा पुत्र अमर होऊ शकला नाही. यामुळे रावणाचा शनिदेवावर कोप झाला आणि त्याने शनिदेवाला पायाखाली ठेवले. आता यातून शनिदेव हे कसे सुटतात ते आपण पाहू…

रवणाप्रमानेच शनीची देखील एक कथा असल्याचं सांगितल जात आहे. हनुमानाने शनी देवाला मुक्त केले होते. सर्वप्रथम नारदमुनी यांनी रावणाला त्याच्या शब्दात गोवले, आणि शनिला तुरुंगात ठेवण्यास भाग पाडले. हनुमान जेव्हा लंकेत गेले तेव्हा त्यांनी लंका जाळण्यापूर्वी शनीला रावणाच्या बंधनातून मुक्त केले होते.

शनिदेवांना तुरुंगात अशा प्रकारे ठेवले होते की सर्वत्र बेलची पाने फेकली गेली कारण शनिदेव त्याच्यावर पाऊल ठेवल्याशिवाय पळून जाऊ शकत नव्हते. नंतर जेव्हा हनुमान लंका जाळण्यासाठी आले तेव्हा त्यांनी शनीला डोक्यावर घेऊन मुक्त केले. महत्त्वाचे म्हणजे शनी देवतांना आधीच वरदान मिळाले होते की फक्त हनुमानच त्यांना या सगळ्यातून मुक्त करेल.

ज्योतिष शास्त्रानुसार शनि ग्रहाच्या दृष्टीचा माणसाच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडतो. अशा स्थितीत शनीला रावणाच्या कुंडलीतील शुभ स्थान बिघडवायचे होते आणि तो तसा प्रयत्न करत राहिला. जर तुम्हाला आमचा लेख आवडला असेल तर कृपया लाईक आणि कमेंट करून आम्हाला कळवा. अधिक अपडेट्स साठी आमचे पेज लाईक करा धन्यवाद