राधेचा मृ’त्यू कसा झाला ? रधेच्या मृ’त्यू माघे नेमके काय कारण होते… एकदा बघाच…

लाईफ स्टाइल

अमर प्रेमाचे प्रतीक म्हणजे राधा-कृष्ण. आज देखील प्रेम हा शब्द म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर राधा-कृष्ण उभे आहेत. प्रेमात अगदी उत्कट आणि निस्वार्थी असे त्यांचे वर्णन केले आहे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्या दोघांचे देखील एकमेकांवर निस्सीम प्रेम होते पण राधा-कृष्णाचे लग्न होऊ शकले नाही. यामुळे अनेक भक्तांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, भगवान श्रीकृष्ण वृंदावनात गेल्यावर राधेचे काय झाले?

तिचे जीवन कसे होते आणि तिचा मृ’त्यू हा सुद्धा नेमका कसा झाला? तर राधा राणीच्या मृ’त्यूची एक कथा सांगितली जाते. या पौराणिक कथेनुसार, राधेच्या मृ’त्यूच्या वेळी भगवान कृष्ण राधेसोबत होते. राधारानी ने जेव्हा देह सोडला तेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपली बासरी मोडली होती आणि पुन्हा कधीही बासरी न वाजवण्याची त्यांनी शपथ देखील घेतली होती.

राधा आणि बासरी भगवान श्रीकृष्णाला खूप प्रिय होत्या. म्हणूनच असे म्हणतात की एकाच्या मृ’त्यूनंतर दुसऱ्याचे अस्तित्व भगवान श्रीकृष्णाने नष्ट केले होते. या प्रकरणात एक अतिशय मनोरंजक आख्यायिका देखील सांगितली गेली आहे. राधा-कृष्णाचे बालपण हे एकत्र गेले होते. दरम्यान, दोघे प्रेमात पडले होते आणि एकमेकांचे अविभाज्य भाग बनले होते.

पण एक वेळ अशी आली की राधा आणि कृष्णाला एकमेकांपासून दूर राहावं लागलं होत. कंसाचा वध करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाला मथुरेला जावे लागले तेव्हाचा हा प्रसंग आहे. भगवान श्रीकृष्णांनी लवकरच परत येण्याचे वचन देखील राधेला दिले होते. पण भगवान श्रीकृष्ण लवकर परतले नाहीत आणि काही काळानंतर त्यांनी रुक्मिणीशी लग्न देखील केले होते.

असे म्हणतात की राधेने कृष्णाची वाट पाहिली पण परिस्थिती अशी होती की भगवान कृष्ण परत येऊ शकले नाहीत. मथुरेला गेल्यावर कृष्णाने कंसाचा आणि त्याच्या राज्याचा नाश करून द्वारकेला येऊन तेथे आपले राज्य स्थापन केले. कृष्णाने वृंदावन सोडल्यानंतर राधाचे आयुष्यही बदलले. राधेने नंतर यादव घराण्यातील एकाशी लग्न केल्याचे सांगितले जाते.

राधेने वैवाहिक जीवनातील आपल्या सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या होत्या, तरीही तिने आपले मन सर्वस्वी कृष्णाला समर्पित केले होते. शेवटी, आयुष्यातील सर्व कर्तव्ये निष्ठेने पार पाडल्यानंतर, वृद्ध राधा भगवान श्रीकृष्णाला भेटायला गेली. तिला समजले की भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्याशी लग्न केले होते पण तरी देखील ती अजिबात दुःखी झाली नव्हती.

द्वारकेत राधेला पाहून भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले. द्वारकेत राधेला कोणी ओळखत नव्हते. भगवान श्रीकृष्णाने राधेला राजवाड्यात राहण्यास सांगितले. दोघेही एकमेकांशी सांकेतिक भाषेत बोलत असत. राधारानी राजवाड्यात राहून तेथील दैनंदिन व्यवहारावर देखरेख करू लागली. संधी मिळताच ती कृष्णाचे दर्शन देखील घेऊ लागली होती.

पण पूर्वी कृष्णाच्या दर्शनात राधेला जो आनंद मिळत होता तो आध्यात्मिक आनंद राधेला त्यावेळी मिळाला नाही. त्यामुळे राधेने महाल सोडून भगवान कृष्णापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. आता राधारानी श्रीकृष्णापासून दूर राहू लागली. कालांतराने ती कमकुवत होऊ लागली. तिचा अंत जवळ आला होता.

अशा स्थितीत भगवान श्रीकृष्ण त्यांच्यापर्यंत पोहोचले. त्यावेळी राधेला बासरी ऐकायची होती. कन्हैयाने बासरीवर अतिशय मधुर संगीत वाजवायला सुरुवात केली. काळ पुढे सरकत असला तरी कृष्णाची बासरी वाजत राहिली. या मधुर संगीतात गढून जात असतानाच शेवटी राधेचा मृ’त्यू झाला.

राधेच्या मृ’त्यूने श्रीकृष्णाला धक्का बसला. अशी आख्यायिका आहे की राधा च्या मृत्युच्या दु:खात श्री कृष्ण यांनी त्यांच्या आणि राधेच्या प्रेमाचे प्रतीक असलेली बासरी देखील तोडली होती.