रात्रभर पाण्यामध्ये भिजवून सकाळी हे तीन पदार्थ खा, कधीच म्हातारपण येणार नाही, उपाशी पोटी हे तीन पदार्थ खाण्याचे आहेत अनेक फायदे !

आरोग्य

जर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम ची मात्रा कमी झाली असेल, तसेच तुम्हाला अशक्तपणा ,थकवा, कमजोरी जाणवत असेल आणि अति लठ्ठपणाची समस्या वारंवार त्रास देत असेल व शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता होत असेल तर हा उपाय करून पहा. अशावेळी खूप महत्त्वाचा ठरणार असा उपाय आजच्या लेखामध्ये सांगितलेला आहे.

हा उपाय आयुर्वेदिक शास्त्र व आहारशास्त्र मध्ये अत्यंत महत्त्वाचं सांगण्यात आलेला आहे. तुमच्या शरीरातील ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत ते हा उपाय केल्याने त्या पूर्णपणे दूर होणार आहे. तसेच तुम्हाला लवकर म्हातारपण पण येणार नाही. तसेच आपल्याला जे काही पदार्थ हा उपाय करण्यासाठी लागणार आहेत ते आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतात.

तसेच आपल्या शरीराला ध पुष्ट ठेवण्यासाठी व शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी या उपायांबद्दल आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. आज हा उपाय करण्यासाठी आपण जो पदार्थ वापरणार आहोत तो म्हणजे चणे. चणे सहज रित्या बाजारात सर्वांना उपलब्ध होतात.

चणे मध्ये अनेक पोषक तत्व भरपूर प्रमाण मध्ये उपलब्ध असतात तसेच कॅल्शिअमची मात्रा पण चांगली असते. चण्याचा उपयोग तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. काहीजण चणे भिजवून सेवन करतात, काहीजण भाजून, काहीजण मोड आलेले प्रसन्न करतात. आपल्यापैकी अनेक जण भिजवलेले चणे खात असतात.

तसेच आपल्या शरीराला मोड आलेले चणे खाल्ल्याने आवश्यक ते प्रोटीन्स सुद्धा मिळत असते. तसेच सोबत गूळसुद्धा खाल्ला जातो. गुळामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण जास्त असते. आणि त्यामुळे तुमच्या शरीरांमध्ये कोणतेही र”क्ता”ची कमतरता असेल किंवा र”क्त संदर्भातील एखादा आजार झाला असेल तर तो आजार दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

त्यानंतरचा दुसरा सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे बदाम. प्रत्येकाला बदामचे अनेक फायदे माहिती आहे. बदामाला पोषक तत्वांचा भंडार मानला जातो तसेच बदामामध्ये विटामीन ए, विटामीन ई हे तत्व भरपूर प्रमाणात असतात आणि म्हणूनच आपण नियमितपणे ते खाल्ले तर आपले शरीर पण मजबूत बनते.

ज्या व्यक्तींना स्मृती दोष आहे आणि वारंवार गोष्टी लक्षात राहत नाही तर अशा व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये बदामाचे सेवन करायला पाहिजे. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की बदाम हे उष्णता निर्माण करणारे पदार्थ असतात आणि म्हणूनच कच्चे बदाम न खाता शक्यतो भिजवलेले बदाम खायला हवे.

रात्री झोपताना आपल्याला तीन ते चार बदाम भिजत ठेवायचे आहेत आणि ते सकाळी उठल्यावर ते बदाम खायचे आहेत. कच्चे बदाम खाल्याने आपल्याला उष्णतेचा त्रास होऊ शकतो त्याचबरोबर तुम्ही रात्री झोपताना कच्चे चणे पण भिजवून ते पण सकाळी खाल्ले तर यामुळे सुद्धा तुम्हाला फरक जाणवेल.

अशा प्रकारे सकाळी उठल्यावर आपण हे दोन्ही पदार्थ गुळासोबत सेवन केल्यास तुम्हाला भविष्यात कोणत्याही पोषक तत्वांची कमतरता कधीच भासणार नाही. त्याचबरोबर तुमच्या शरीरात नेहमी उर्जा संचारेल.