योग्य गुंतवणूक करून तुम्ही देखील तुमचा पैसा वाढवू शकता… जाणून घ्या त्या साठीच्या 4 महत्त्वाच्या पायऱ्या….

सामान्य ज्ञान

संदीप माहेश्वरी ही सकारात्मकता पसरवणारी एक उत्तम व्यक्ती आहे. त्याचा एक व्हिडिओ युट्युबवर सहज पाहन्यात आला होता. ज्यामध्ये त्याने आपल्याजवळ असलेले पैसे कसे वाचवायचे, गुंतवायचे आणि कसे वाढवायचे याचे काही सोपे मार्ग सांगितले आहेत. जे की आज आम्ही आजच्या लेखातून तुमच्यासोबत शेअर करत आहोत.

1. पैसे उभारण्यासाठी आधी पैसे वाचवा :- अनेकांना पैसे आल्याबरोबर लगेच पैसे खर्च करण्याची वाईट सवय असते. प्रत्येक व्यक्तीचा खर्च हा त्या व्यक्तीच्या अनुसार वेग वेगळा असतो. तथापि, आपण जे काही कमावता त्याद्वारे आपण जितके पैसे वाचवू शकता तितके कसे वाचवता येईल यावर लक्ष केंद्रित करणे सगळ्यात जास्त महत्वाचे आहे.

पैशाची बचत करण्यासाठी, तुम्हाला प्रथम माहित असणे आवश्यक आहे की तुम्ही एका महिन्यात कुठे, कसे आणि किती खर्च करता. हे तुम्हाला तुमच्या असणाऱ्या महिन्याच्या खर्चाचा अंदाज देते आणि त्याचा उपयोग करून ते तुमचे पैसे वाचवण्यासाठी वापरले जात असते.

2. पैसे योग्य ठिकाणी गुंतवा :- बरेच जण फक्त पैसे वाचवत असतात. पण फक्त बचत करून पैसा हा काही वाढत नाही. त्यामुळे पैसा उभा करण्यासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे हे देखील तेवढेच आवश्यक बनले आहे. प्रत्येकाचे बँकेत बचत खाते हे असतेच, ज्यामध्ये बरेच लोक पैसे वाचवायचे आहेत म्हणून पैसे ठेवत असतात.

त्यांना बँकेकडून दरवर्षी कितीतरी टक्के त्यावर व्याज मिळत असते. पण त्याचा फारसा काही उपयोग होत असताना दिसत नाही. म्हणून, बचत खात्यात पैसे जमा करण्यापेक्षा FD वर मुदत ठेव करणे अधिक फायदेशीर आहे. शिवाय, तूमचे पैसे सुद्धा त्यामुळे अधिक चांगल्या प्रमाणात वाढत जातात.

3. पैसे उभारण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारचा विमा घ्यावा लागेल? :- आजकाल बरेच लोक त्यांचे पैसे वेगवेगळ्या प्रकारच्या विम्यात गुंतवत असतात. परंतु विम्याचा सर्वोत्तम पर्याय कोणता आहे हे त्यांना माहीत नाही. जर तुम्ही पैसे गुंतवण्‍यासाठी विम्याच्‍या पर्यायाचा विचार करत असाल, तर टर्म इन्शुरन्स पॉलिसी हा पैसा गुंतवण्‍यासाठी आणि

तुमच्या उत्तम भविष्याकडे पाहण्‍यासाठी एक सर्वोत्तम, आणि त्या बरोबरच सर्वात फायदेशीर असाच एक पर्याय आहे. जेव्हा तुम्ही त्यात पैसे गुंतवता, तेव्हा तुम्ही तुमच्या विवेकबुद्धीनुसार एक निश्चित रक्कम सेट करू शकता आणि ते तुमच्या कठीण काळात देखील तुम्ही वापरू शकता.

4. शेअर बाजार की म्युच्युअल फंड? :- आजकाल बरेच लोक शेअर बाजारात आपला पैसा गुंतवताना दिसतात. शेअर मार्केटमध्ये खूप पैसा आहे ही गोष्ट कुणाकडून तरी ऐकून काही लोक त्यात पैसा गुंतवत असतात. पण ते खूप धोकादायक असू शकते. कारण ज्या व्यक्तीला शेअर बाजाराची माहिती नाही त्याने आपले सर्व पैसे थेट गुंतवू नयेत. दुसरीकडे, म्युच्युअल फंड हे तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्याचा उत्तम मार्ग आहे.

SIP नावाचा गुंतवणूक पर्याय लोकप्रिय होत आहे. कारण शेअर बाजाराच्या वाढीवर किंवा घसरणीवर त्याचा थेट परिणाम होत नाही. यामुळे तुमचे पैसे जिथे आहेत तिथे सुरक्षित राहतात आणि व्याज अधिकाधिक वाढत जाते. तेव्हा या पैशातून पैसे कमवायला सुरुवात करा आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी योग्य तरतूद करून आनंदी जीवन जगा.