या राशीच्या लोकांसाठी सुरु होणार आहे खूप त्रास दायक काळ, पुढील अडीच वर्षे राहावं लागणार सांभाळून…!

राशी भविष्य

ग्रहांची स्थिती नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच बदलत असते. आणि आता अडीच वर्षानंतर अशा स्थितीत शनि हे आपली राशी बदलणार आहे. जेव्हा शनीची राशी बदलतो तेव्हा अनेक राशीचा लोकांच्या आयुष्यात अशांतता सुरू होणार आहे. विशेषत : शनीची साडेसाती ज्या राशींवर सुरू आहे किंवा शनी धैय्या सुरू आहेत, तर अशा राशींवर शनीच्या संक्रमणाचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

२९ एप्रिल रोजी ह्या शनी राशीच परिवर्तन होणार असून या दिवशी न्यायाचे देवता शनिदेव हे मकर राशी मधे प्रवेश करणार आहेत. आणि मग 29 मार्च 2025 पर्यंत ते मकर राशीमधेच ते राहणार आहेत. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, हा जो अडीच वर्षांचा काही कालावधी आहे तो नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये भूकंप आणू शकतो.

तर आम्ही तुम्हाला सर्व प्रथम, सांगतो की शनीची दशा ही सर्व लोकांसाठी वाईट ठरत नाही. ज्या लोकांच्या कुंडलीत शनी मजबूत स्थितीत आहे, त्यांना शनिचा साढेसातीमधे किंवा शनी धैय्यामध्ये लाभ होण्याची दाट शक्यता निर्माण होत असते. यासोबतच ज्या कोणाच्या कुंडलीत जर शनि कमकुवत स्थितीत आहे त्यांना अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते.

कुंभ राशीच्या लोकांना शनीच्या या संक्रमणामुळे सर्वाधिक त्रास होणार आहे. कारण शनी ही साडेसातीचा अत्यंत क्लेशदायक पर्व त्यांच्यावर सुरू होणार आहे. शास्त्रानुसार, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की शनी साढेसातीचे तीन चरण आहेत, ज्यामध्ये याचा दुसरा टप्पा हा सर्वात जास्त त्रासदायक असल्याचा मानला गेला आहे.

या दरम्यान, हा चरण 29 एप्रिल 2022 पासून कुंभ राशीच्या लोकांवर सुरू होणार आहे आणि हा टप्पा 29 मार्च 2025 रोजी पर्यंत संपेल. त्यामुळे या राशीच्या लोकांनी खूपच सावध राहण्याची गरज आहे. या काळात कोणतेही काम करताना अत्यंत सावधपणे करा. तुम्ही ही खबरदारी घ्यायलाच हवी : या काळात कोणावरही विश्वास तुम्ही ठेवू नये ही गोष्ट कायम लक्षात ठेवा.

कारण तुमच्या सोबत विश्वासघात होऊ शकतो याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच बरोबर कधीही एकट्याने प्रवास करू नये. कारण असे केल्याने तुमच्यासाठी ते धोकादायक ठरू शकते. कामाच्या ठिकाणी पण कोणतेही काम करताना ते काम पूर्णपणे तपासल्यानंतरच आणि त्या कामाची पूर्ण माहिती घेतल्यानंतर च करा.

त्याच प्रमाणे कामाच्या ठिकाणी पूर्णपणे शांत राहण्याचा प्रयत्न तुम्ही करायला पाहिजे. कोणाशीही भांडण करू नका. फक्त तुम्ही तुमच्या कामाशी काम चालू ठेवा. तसेच नियमित शनिदेवाची पूजा तुम्ही करावी आणि कोर्ट केसेस पासून जितके शक्य सेल तितके दूरच राहावे. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी हे अवश्य करा : एखाद्या निर्जन ठिकाणी असलेल्या किंवा एखाद्या मंदिरात असणाऱ्या पिंपळाच्या झाडाच्या जवळ सूर्यास्तानंतर तुम्ही दिवा लावावा.

त्याच बरोबर जर तुम्ही मनोभावे हा उपाय केला तर या उपायामुळे तुमची आर्थिक समस्या ही लवकरच दूर होईल. तसेच पिंपळाला जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला त्याची पूजा पण करायची आहे आणि त्याला सात प्रदक्षिणा पण घालायच्या आहेत. कोणत्याही गरीब व्यक्तीला अन्नदान हे तुम्ही जरूर केले पाहिजे, असे केल्याने शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमचे दारिद्र्य दूर होण्यास पण मदत होते.

तेल अर्पण करून तुम्ही शनिदेवाची पूजा करा. त्याच बरोबर शनिदेवाला तुम्ही निळी फुले अर्पण केले तर ते तुमच्यासाठी उत्तम असेल. त्याचबरोबर हे कायम लक्षात ठेवा की शनिदेवाची पूजा करताना प्रत्यक्ष तुम्ही शनीची मूर्ती बघायची नाही.

सकाळी सकाळी आंघोळ करून प्रत्येक शनिवारी तुम्ही तेलाचे दान करावे. हे सर्व केल्यानंतर तुम्ही एका भांड्यामध्ये तेल घ्या आणि त्या तेलामध्ये तुमचा चेहरा पहा. आणि यानंतर ते तेल एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा.