मुलीने, मुलीच्या आई-वडिलांनी लग्नासाठी इतक्या अटी घातल्या की, शेवटी त्या मुलीचे जे झाले ते पाहून अंगावर काटा उभा राहिल….!

लाईफ स्टाइल

सर्वसामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली चिमणी लहानपणापासूनच हुशार मुलगी म्हणून ओळखली जात होती. चिमणीला एकही बहीण नाही पण एक मोठा भाऊ आहे. तसेच तिचे आई-वडील दोघेही नोकरी करतात. दोघेही सरकारी कर्मचारी आहेत. मोठा भाऊ बी.कॉम. झाला आणि त्याला सहकारी बँकेत नोकरी मिळाली. चिमणी हुशार होती त्यामुळे ती इंजिनीअरिंग करायला गेली. बी. ई. झाली आहे. कॅम्पसमध्येच तिला इन्फोसिसमध्ये नोकरी मिळाली.

4 लाखांचे चांगले पॅकेज मिळाले. आई, वडील आणि भावाचा पगारही फारसा नव्हता. वयाच्या 22 व्या वर्षी तिने नोकरी करायला सुरुवात केली. आता तिचे पालक तिच्या लग्नासाठी स्थळे शोधू लागले. मुलगा हा जातीतच हवा आहे, तो इंजिनियर हवा आहे, आयटी मधलाच पाहिजे आहे किंवा सोफ्टवेअर पण चालेल. या अटी ठेऊन च मुले बघायला सुरुवात झाली. पहिलेच स्थळ आले आणि ते त्यांच्या अटींमध्ये बसणारे होते. मुलगा त्याच जातीचा होता.

एक अभियंता होता. IT मध्येच होता. 6 लाख रुपयांचे पॅकेज होते त्याला.तो देखणा आणि रुबाबदार होता पण… या ‘पण’ ने पूर्ण घोटाळा केला. मुलाचे वय 27 वर्षे आणि मुलीचे वय 22 वर्षे होते. वयाचा फरक 5 वर्षांचा होता. चिमणीच्या आईला वयाचा फरक खूप मोठा वाटत होता. त्यांच्या मते मुलगा आणि मुलगी यांच्या वयातील फरक 2 ते 3 वर्षांपेक्षा जास्त नसावा. क्षमस्व म्हणून त्याला नाकारल. मुलगी बी.ई. असेल तर मुलगा त्याच्यापेक्षा जास्त शिकलेला असावा.

चिमणीची आई मुलाचे शिक्षण हे मुलीच्या शिक्षणापेक्षा वरचढ असावे यावर ठाम होती. म्हणूनच मुलगा जास्त शिकलेला म्हणजेच तो M.E., M.A. किंवा पीएच.डी. तरी असायलाच पाहिजे होता. आणि आता ही अशी नवी अट होती. आणि या अती ठेऊन मुलं बघायला सुरुवात झाली. पण अशी मुले भारतात दुर्मिळ आहेत. परदेशात अशी अनेक मुले आहेत. तर परदेशातून एक-दोन स्थळे आली. पण ‘परदेशा मधली मुले नको’ अशी नवी अट घालण्यात आली.

भारतातील मुले टक्कल पडलेली आणि प्रौढ दिसत होती, ते मोठे, जाड भिंग असलेला चष्मा घालत होती. चिमणी ही अगदीच उत्तम दिसत नसली तरी देखील नाकी आणि डोळी ती तशी नीटस होती. हुशार होती. तिचे व्यक्तिमत्व बऱ्यापैकी प्रभावी होते. तिला त्यातली काही मुले पसंत पडत नव्हती. मग एक नवीन खेळ सुरू झाला. चिमणी ला आवडलेल्या मुलांना चिमणी आवडली नाही. आणि ज्या मुलांना चिमणी आवडली ते तीला आवडले नाही.

या खेळात चिमणीचे वय वाढत जात होते. ती आता 26 वर्षांची झाली. तरी सुद्धा हात अजून पिवळे झाले नव्हते. त्यामुळे थोडी तडजोड करून ‘बी. ई.’ ला बी. ई. चालेल अस म्हणून परिस्थिती हलकी केली. मात्र चार वर्षांच्या नोकरीत चिमणीचे वेतन पॅकेज सात लाखांवर पोहोचले होते. मुलांसाठीचे सॅलरी पॅकेज त्यापेक्षा खूपच कमी होते. ‘नवर्याचा पगार बायकोपेक्षा जास्त असावा’ ही चिमणीची नवी अट आणि त्यामधे ही मुल बसत नव्हती.

एक-दोन मुले अशी पण होती जी व्यवसाय करतात आणि ज्यांचे उत्पन्न चिमणीच्या पेक्षा जास्त आहे. मात्र मुलगा नोकरी नाही तर व्यवसाय करतो, त्यामुळे थेट नकार दिल्याचे सांगण्यात आले. आता मात्र चिमणी चे वय 28 वर्षांच झाल आहे आणि ती आता एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर येऊन उभी आहे. या चिमणीला सहा महिन्यांसाठी एका प्रकल्पासाठी अमेरिकेत पाठवण्यात आले होते. आता ६ वर्षे झाली, ती तिकडेच आहे आणि आता तिकडचीच झाली आहे.

‘परदेशामधील मुल नको’ ही अट आता बदलली आहे. मात्र आता गंगा नदी मागे वाहू लागली आहे. चिमणीचे वय आता संपुष्टात आले आहे. ती प्रौढ दिसत होती. ओढून ताणून ती तरुण दिसण्याचा प्रयत्न करते, परंतु हे ओळखण्यायोग्य आहे. परदेशात पाहिलेली बहुतेक मुले वयाच्या 35 व्या वर्षीतली, घटस्फोटित किंवा काही वाईट व्यसनांना बळी पडलेली आहेत. पण भारतातील मुले तर आता सरळ नकार देतात. आता अटी बऱ्यापैकी शिथिल करण्यात आल्या आहेत.

पण मुलगा मात्र मराठीच असला पाहिजे. तो आता MCA किंवा MCM असला तरीही चालणार आहे. त्याचा पगार कमी असला तरी हरकत नाही. पण तरीही नशीब काही साथ देत नाही..! चिमणीचे पालक आता ज्योतिषाचे उंबरठे झिजवू लागले आहेत. सर्व प्रसिद्ध ज्योतिषींना चिमणी ची पत्रिका दाखवली आहे. मंगळ नसेल तर तिच्या लग्नात कोणता पाप ग्रह येतोय हे पाहण्यासाठी उतावीळ आहेत! पण प्रत्येक ज्योतिष हेच सांगतोय की असा कोणताही ग्रह आड येत नाही आहे.

येत्या काही महिन्यांत लग्न निश्चितच होणार आहे. आणि त्यामुळे भरमसाठ फी अशी आश्वासने देऊन उकळली जात आहेत. चिमणीला स्वतःचे लग्न तिनेच ठरवण्याचे स्वातंत्र्य सुद्धा दिले आहे. तु कोणाशीही लग्न कर. तो फक्त मुलगा पाहिजे अशी अट ठेवली. पण प्रेमविवाह करण्याचे धाडस चिमणीत नाही. चिमणी आता 32 व्या वर्षातून आणि 33 वर्षात आली आहे. चिमणीसाठी अजूनही मुले शोधत आहे. अपेक्षा असली की मग काही तडजोडीसाठी जागा शिल्लक असते.

परंतु अटींमध्ये तडजोडीला जागा नसल्याचे सांगितले जाते. चिमणीच्या पालकांनी याआधी अपेक्षांसाठी अटी ठेवल्या होत्या. नंतर अपेक्षेप्रमाणे पुन्हा अटी बदलल्या पण तोपर्यंत चिमणीचे लग्नाचे वय उलटून गेले होते. अपेक्षा आणि परिस्थितीचा हा खेळ अनेक चिमण्यांच्या आयुष्यात सुरूच असतो. चिमणीच्या पालकांना आता त्यांच्या वयामुळे प्रथम स्थान नाकारण्यात आल्याची खंत आहे. पण आता त्याचा उपयोग काय? ते बैल गेला आणि झोपा केला अशा स्थितीत आहेत.

आजच्या समाजात विशेषतः उच्चशिक्षित कुटुंबात अशा चिमण्यांची संख्या वाढत आहे ही खरी चिंतेची बाब आहे. आजकाल, चिमणी श्रेणीत प्रवेश करायचा की नाही हे तरुण आणि त्यांच्या पालकांवर अवलंबून आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? काय वाटतं? चिमणी आता 40 वर्षांची झाली आहे, पण तरीही नशीब नाही..! कोण चुकले? चिमणी? चिमणीचे वडील? की चिमणीची आई? मित्रांनो, जास्त अपेक्षा ठेवून मुला-मुलींचे आयुष्य आणि भविष्य खराब करू नका.