माझं प्रेम होत त्याच्यावर लग्न सुद्धा झाल…पण तो ‘न पुंसक’ होता…मग पुढे जे झालं… तो सारखा मला…

लाईफ स्टाइल

हेल्लो मित्रांनो, नीता ऑफिस मध्ये पोहोचल्यावर नेहमी प्रमाणे सर्व काही ठीक चालले होते, पण अचानक अमित ने येऊन नीताला सर्वांसमोर बेधडकपणे प्रपोज केले आणि तिने पण त्याला नकार न देता लगेच होकार दिला कारण नीता जी त्या कंपनीमधे कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत होती, आता ती त्या कंपनीच्या मालकाची पत्नी म्हणून त्या कंपनीची मालकीण होणार होती.

अमित आणि त्याचा मित्र विजय हे दोघे सुद्धा भागीदारी मधे त्यांची कंपनी चालवत होते. अमित हा शहरातील अतिशय श्रीमंत आणि प्रतिष्ठित असा माणूस होता, त्याच्याकडे अफाट संपत्ती होती. अश्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित मलाला कोणतीही श्रीमंत मुलगी सहज भेटली असती. तरीही नीता सोबत लग्न करण्याच्या अमितच्या निर्णयाने सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला होता. ऑफिसच्या पहिल्याच दिवसापासून अमित हा नीताच्या प्रेमात पडला होता. हसतमुख, लाजाळू आणि मनमिळावू स्वभावाने निताची अगदी काही वेळातच सर्वांशी मैत्री झाली होती.

नितचा रंग हलका सावळा, सरळ रेखीव बांधा, भावपूर्ण डोळे, लांब केस, हसरा आणि आनंदी चेहरा होता. हळूहळू त्याची निताशी ओळख झाली. ते दोघे सुद्धा आता चांगले मित्र बनले होते आणि साहजिकच त्यांच्या मैत्रीचे रुपांतर हे पुढे प्रेमात झाले होते. नीता ही मध्यमवर्गीय कुटुंबातील अतिशय साधी सरळ मुलगी होती पण अमित मात्र चांगलाच श्रीमंत होता. मात्र, असे असूनही अमित च्या कुटुंबीयांनी नीताला त्यांची सून म्हणून आनंदाने स्वीकारले होते. त्याने कमी लोक आणि कमी खर्चात लग्न केले.

नीताच्या कुटुंबाला खूप आनंद झाला होता की त्यांच्या मुलीला इतका छान नवरा आणि इतकी छान जागा, इतक सुंदर सासर मिळाल आहे. आलेला प्रत्येक पाहुणा त्या दोघांकडे बघून आशीर्वाद देत होता. परंतु निताचा हा आनंद काही फार काळ टिकणारा न्हवता. लग्नानंतर दोघेही बाहेर परदेशी गेले होते. विमान प्रवास हे तर नीताचे फार मोठे स्वप्न होते आणि आज ते पूर्ण झाले होते. आजपर्यंत ती बस आणि ट्रेननेच प्रवास करायची. आज सव्वीस वर्षांने प्रथमच नीताला विमानात बसण्याची संधी मिळाली होती.

विमानतळावर विजय सारखेच दिसणारा कोणीतरी पाहिल्यावर नीताने या बद्दल अमित ला माहिती दिली. विजय हा अमित चा काही फक्त बिझनेस पार्टनरच न्हवता तर तो त्याचा खूप जवळचा मित्र देखील होता. अग विजय इथे कसा काय येईल? मी तर त्याला आठवड्याचे चांगले काम दिले आहे. मी त्याला एकदा फोन करू का..? अमित ने नीताला विचारले. अरे नाही, माझा काहीतरी गैरसमज झाला असावा. त्याच्या सांगण्यावरून अमित आणि नीता तिथून निघून गेले.

अमितने नीताला एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये नेल्याने नीताला खूपच जास्त आनंद झाला होता. आणि ही सर्व दृश्ये नीताने फक्त स्वप्नात पाहिली होती. तिथले सर्व सुंदर आणि अप्रतिम दृश्य पाहून ते दोघे सुद्धा त्यांच्या खोलीत निघून गेले. “आवडले का तुला हे हॉटेल?” अमित त्याच्या रूमवर आल्यावर त्याने नीताला विचारले, “हो, पण हे हॉटेल खूप महाग असेल, नाही का?” अग हे हॉटेल आवडले ना तुला…

तुझ्या आनंदाच्या तुलनेत पैसा काहीच नाही. असे म्हणून अमित ने तिला आपल्याजवळ घेतले आणि ते दोघेही झोपी गेले. मात्र मध्यरात्री ज्यावेळी नीताला जाग आली होती त्यावेळी तिला ती त्या खोलीत एकटीच असल्याचे जाणवले. तिने आजुबाजुला बघितले पण अमित तिला कुठेच सापडला नाही म्हणून नीता त्याचा शोध घेऊ लागली. तिने लाईट लावली आणि ती त्या खोलीतून बाहेर आली.

आणि ती बाहेर आल्यावर तिने बाजूला बघितले ते त्या ठिकाणी सर्व खोल्या बंद असल्याच्या तुला दिसल्या होत्या पण अमित ला आवाज देत देतच नीता एका खोली च्या दरवाजा बाहेर येऊन थांबली होती. आणि त्याच क्षणी तिला अमित चा आतून हसताना चा आवाज ऐकू येतो. आणि त्याच क्षणी नीता ने न डगमगता खोलीचा दरवाजा ठोठावला. मात्र त्याचवेळी अमित ने अर्धनग्न अवस्थे मधेच दरवाजा उघडला आणि टॉवेल गुंडाळला असलेल्या अवस्थेत तो तिच्यासमोर उभा होता. आणि त्याला अशा अवस्थेत पाहून मात्र नीताला घाम फुटला.

त्याने तिला काही विचारताच आतून विजय आवाज आला आणि नीताने आत जाऊन पाहिले तर विजय अंगावर चादर घेऊन अर्धनग्न अवस्थेत झोपून असलेला नीताला दिसला. ती त्यांना त्या तश्या विचित्र आणि अवघडलेल्या अवस्थेत पाहत राहते आणि लगेच वळून तिच्या खोलीकडे निघून जाते. अमित सुद्धा ती गेल्यावर तिच्या मागे येतो, “मी तुला विजय बद्दल सर्व काही सांगेन नीता. ऐक नीता, विजय आणि माझे एकमेकांवर खूप म्हणजे अतिशय प्रेम आहे, आम्ही एक कपल सारखच एकत्र राहतो.

मी तुझ्याशी लग्न केले आहे आणि त्याचे कारण म्हणजे आमचे कुटुंब आमच्या या नात्याला काही आणि कधीच मान्यता देणार नाही आणि आम्हाला एकत्र राहण्याची कधीच परवानगी मिळणार नाही. म्हणूनच मी तुझ्याशी लग्न केले कारण असे केल्याने आमचे कुटुंब आणि प्रतिष्ठा सुरक्षित राहीली असती. मी तुझ्यावर कोणतेही आणि कसलेच बंधन घालणार नाही. मी तुझी आणि तुमच्या कुटुंबाची नक्कीच सगळी काळजी घेईन. फक्त माझे हे रहस्य तू कृपया कोणाला सांगू नको. हे सर्व समजल्यानंतर मात्र नीताला चांगलाच धक्का बसला होता.

अमित सोबत होणार लग्न जसं तिच्यासाठी एक मोठं स्वप्न ठरल होतं, त्याचप्रमाणे त्या स्वप्नातून नीता ला मिळालेला धक्का आणि त्या धक्क्यातून सावरन हे नीता साठी खूप जात त्रासदायक आंज धक्कादायक होत. आता या पुढे काय करायचे याचा विचार करण्यासाठी नीता ने अमित ला तिला थोडा वेळ देण्यासाठी सांगितले. पण झाल्या गोष्टीबद्दल पुढे काय करावं हे तिला काहीच कळत नाही. आणि ती रात्रभर झालेल्या गोष्टीबद्दल स्वतःला आणि परिस्थिती ला जबाबदार धरून विचार करत तशीच बसून राहते.