मस्तानी आणि बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाचे काय झाले, अज्ञात इतिहास जे आपल्याला माहीत नाही .. त्यांच्या मुलाचा सांभाळ कोणी केला असेल ? पुढे काय झाले बगा…

लाईफ स्टाइल

मित्रांनो, बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे. ही माहिती जरी बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या नावांपुरती मर्यादित असली तरी देखील या दोन नावांच्या वलयाबद्दल आपल्याला थोडी माहिती आहे.  तथापि, त्यांच्या मुलाचे पुढे काय झाले आणि कसे झाले हे आपण सर्वांनी नक्कीच ऐकले किंवा वाचलेले नसेल.

तर मित्रांनो, आजच्या लेखात आपण याबद्दल विशेष अशी काही माहिती जाणून घेणार आहोत. मुघल सम्राट मुहम्मद बंगशापासून आपले बुंदेलखंड हे राज्य वाचवण्यासाठी म्हणून राजा छत्रसाल यांनी श्रीमंत बाजीराव पेशवे यांना बोलावून घेतले होते. छत्रसाल हा हिंदू राजा असल्याने बाजीराव पेशवे त्याच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी बंगशा ला पराभूत करून बुंदेलखंड राज्याची मुगलांपासून सुटका केली.

बाजीरावसाहेबांचा हा पराक्रम पाहून खूष होऊन छत्रसाल राजाने त्यांना बुंदेलखंड राज्यातील १/३ हिस्सा आणि पन्ना येथील हिऱ्याची खाण दिली. त्याच बरोबर त्याच्या राणीची मुलगी मेहरुन्निसा बेगम उर्फ मस्तानी हिचा विवाह  पन्ना येथेच मल्हारराव होळकर वगैरे अशा मातब्बर सरदारांच्या साक्षीने खांडा या पद्धतीने बाजीराव पेशव्यांशी लावून दिला. परंतु तिला सर्वांनी बाजीराव ची दुसरी पत्नी मानलेच नाही व ते तिला उपस्त्री मानायचे.

पुढे बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांना कृष्णसिंह उर्फ समशेर बहादूर नावाचा मुलगा झाला. मराठा साम्राज्यासाठी विश्वासराव आणि सदाशिवराव भाऊ यांच्यासह पानिपतमध्ये लढत असताना निधन झालेल्या श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या लाडक्या आणि विशेष सरदाराबद्दल ही विशिष्ट माहिती आहे. कृष्ण सिंग उर्फ समशेर बहादूर!  तो बाजीराव पेशवा यांना दुसऱ्या मस्तानी यांच्यापासून झालेला मुलगा होता.

1734 मध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि रघुनाथरावदादांकडे च ते राहत होते.  रघुनाथरावदादांबरोबरच त्यांचीही शुद्धी करण्याचा रौस्वामींचा मानस होता, असे म्हणतात. आयुष्यातील केवळ सहा वर्षे तो आपल्या आई-वडिलांसोबत राहिला.  त्यानंतर एक लेकुरवाळा म्हणूनच लहानपणीपासून त्याला गणले गेले. मात्र, आई-वडिलांच्या निधनामुळे वयाच्या सहाव्या वर्षी एकटे पडलेल्या समशेर बहादूर या चिमुकल्याचा सांभाळ नानासाहेबांनी त्यांच्या सख्ख्या भावाप्रमाणे केला.

त्यामुळेच मागे त्यांचा लाडका असा मुद्दाम उल्लेख केला गेला. श्रीमंत नानासाहेब पेशवे झाल्यावर त्यांनी लेकुरवाल्यासंबंधीच्या सर्व प्रचलित चालीरीती मोडून काढत समशेर बहादूर यांना मराठी आणि फारसी ह्या भाषांची वर्णमाला लावून यांची ओळख करून दिली.  त्यांनी त्यांना युद्धशास्त्रातही प्रभुत्व मिळवून दिले. त्यांनी त्यांना हिंदू धर्माच्या सर्व चालीरीती शिकवल्या आणि त्याच वेळी त्यांना त्यांच्या आईच्या धर्मातील विधी जसे की प्रार्थना, कुराण वाचणे, दर्ग्यांना भेट देणे इत्यादींची सुद्धा त्यांना सवय लावली.

नानासाहेबांनी समशेर बहादूरकडे विशेष लक्ष दिले.  त्यांची मराठी आणि मोडी अक्षरे खूप सुंदर होती.  हे पाहून नानासाहेबांनी समशेर बहादूरला सदाशिवराव भाऊंच्या स्वाधीन केले. त्यांनीच समशेर बहादूरला फळाचे आणि युद्ध शास्त्र ची कला शिकवली. समशेर बहादूर तलवारबाजीसाठी चांगलाच सज्ज झाला होता. त्यामुळे वयाच्या सोळाव्या वर्षी नानासाहेबांनी त्यांना पेशवेपद दिले.

गोविंदराव काकिर्डे यांच्याकडे समशेर बहादूर यांचा कारभार देण्यात आला. त्याचा पेहराव म्हणजे मुस्लिम आणि हिं दुस्तानी पोशाख यांचा मिलाफ!  मुस्लीम पगडी आणि त्यावर मराठी तुरा, तसेच मराठा अंगरखा, बुंदेलखंडी दुपट्टा, कमरेला ब्राह्मणी गुंडाळलेले, मखमली म्यान, त्यात तुर्की तलवार, हातात पारसी कट्यार अशा पोशाख मधे ते उठून दिसत. तो त्याच्या पालकांसारखाच देखणा होता हे वेगळे सांगायला नको.

नानासाहेबांनी त्याला अशा प्रकारे वाढवले होते की त्याचा मोठा भाऊ प्रेमाने त्याची काळजी घेत असावा. सर्व आवश्यक शिक्षण वगैरे पूर्ण करून नानासाहेबांनी त्याचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नानासाहेबांनी त्यांचा विवाह पेठ संस्थानच्या वसाहतवाल्यांच्या कन्या लालकुंवर यांच्याशी लावला.  हा विवाह १७४९ मध्ये झाला होता. आणि या विवाहानंतर केवळ चारच वर्षांनी म्हणजेच १७५३ साली लालकुंवर् दुर्दैवाने मरण पावली.

त्याच वर्षी नानासाहेबांनी समशेर बहादूरचा दुसरा विवाह मु सलमानी घराण्यातील मेहेरबाईंसोबत केला. तिचे पती ब्राह्मणांप्रमाणे सर्व प्रथा पाळतात याचे तिला कौतुक वाटले. फडावरचा कारभार सुरू केल्यानंतर श्रीमंत नानासाहेबांनी त्यांना रणभूमी ची सवय लावण्याचे ठरवले. त्यानुसार त्याला राजपुताना आणि हिंदुस्तानच्या मोहिमेवर पाठवण्यात आले.

यात त्याने चांगली कामगिरी केली. त्यांचे शौर्य व निष्ठा पाहून नानासाहेबांनी त्यांना साहेब नौबतीचा मान दिला व शिक्काही वापरण्यास दिला. 1758 मध्ये त्यांना मेहेरबाईपासून एक मुलगा झाला. त्याचे नाव पुढे अली बहादूर असे ठेवले गेले. समशेर बहादूरला रमाबाई आणि फुलबाई या दोन राण्या होत्या. परंतु त्यांच्यापासून त्यांना मुल असण्याचा उल्लेख नाही.

पुढे १७६१ मध्ये विश्वासराव आणि सदाशिवराव भाऊंसोबत समशेर बहादूरही पानिपत च्या लढाईमध्ये उतरला आणि त्यामुळे तो त्यातच जखमी झाला. तिथून जवळच भरतपूर येथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांची कबर अजूनही तिथे आहे. त्यांची नित्य पूजाही सुरू आहे.  स्थानिक लोक त्या कबर ला बडा अवलियाची कबर सुद्धा म्हणतात. समशेर बहादूरची पत्नी आणि मुलाची काळजी नंतर थोरले माधवराव पेशवे आणि सवाई माधवराव पेशवे यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्य प्रमाणे घेतली आणि त्यांना त्यांनी कुटुंबातील सदस्याप्रमाणे सांभाळले.

वरील माहिती विविध कथांच्या आधारे संकलित करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचा गैरसमज पसरवण्याचा त्याचा उद्देश नाही. तसेच आत्ताच आमचे पेज लाईक करा आणि अशी आणखी माहिती मिळवण्यासाठी पेज ला लाइक आणि शेअर करायला विसरू नका.