बायकोची आई ती आई आणि नवऱ्याची आई म्हणजे……म्हातारी, बिनकामी, ओझी वाटणारी..! मनाला चटका लावणारी सत्य घटना…

लाईफ स्टाइल

उ’च्चारला तरी मना मध्ये माया, प्रेम या भा’वना येणारा शब्द म्हणजे आई. मायेचा पाझर फुटतो. अस बोलल जात की एक मूलगी आईवर जास्त माया करत असते आणि तिचा जी’व आपल्या आईवर खूप असतो. जर ती सासरी गेली तर मग आईवर खूपच जास्त माया होते. पण मुलाचे असे नसते. काही मुले लग्न झाल्यानंतर बायको आल्यावर , आईचा रा’गरा’ग करतात आणि आई त्यांना नकोशी वाटते.

परमेश्वराने एकापेक्षा जास्त (अनेक) नात्यामध्ये मुलींना बां’धले आहे.याच कारण असे असू शकते कि मुलगी ही सर्वाना सांभाळणारी असते. तसेच मुलगी सर्वांचा आदर करणारी आणि काळजी घेणारी घरातील व्यक्ती असते. म्हणून तर तिच्यावरील आईचे छत्र कधी परमेश्वराने हरवू दिले नाही. त्यामुळेच मुली माहेरात असताना आईच्या छत्र छायेखाली राहतात आणि लग्नानंतर सासरी गेल्यानंतर सासूच्या रुपात त्यांना दुसरी आई मिळते. पण प्रत्येक मुलगीला हा दागिना सांभाळून ठेवायला जमत नाही.

मुली जेव्हा सासरी जातात तेंव्हा त्यांना नवऱ्याची आई ओझी वाटते, आयती बसून खाणारी व्यक्ती आहे असे वाटू लागते. सुनांच्या कडून सासूला खूप वाईट वागणूक मिळते. वेळेवर खायला देत नाहीत, औषध पाण्याला पैसे देत नाही, सतत अपमान करणे, मोठयाने व रागात बोलणे, सुनबाई मुलाचे कान भरते, त्यामुळे मुलगाही व्यवस्तीत बोलत नाही. असे घडत असते. मुलगा जर कामा निमित्त बाहेर शहरात असेल तर मग वेगळीच परिस्तिथी, अशा तक्रारी सासू -सासऱ्यांच्या ऐकायला मिळतात.

पण आई-वडील कधीच आपल्या मुलांनबद्दल राग मनात बाळगत नाहीत, त्यांना फक्त इतकेच हवे असते की त्यांची मुले आनंदात आणि सुख समाधा’नात राहावीत. सून, मुले कशी ही असले तरी मुले जेंव्हा आजारी पडतात तेंव्हा सगळ्यात आधी मुलांच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवणारे आई -वडीलच असतात. मायेने विचारपूस करणारे वेळ प्रसंगी काही वाटेल ते करायला तयार होतात. आजची मुले आई वडिलांना त्यांच्या संपत्ती साठी सांभाळतात.

जो पर्यंत त्यांची इ’स्टेट मिळत नाही तो पर्यंत त्यांचाशी गोड बोलतात. त्यांच्या मतांचा आदर पण करतात, आणि एकदा त्यांची सर्व इ’स्टेट नावी करून घेतली कि नंतर ते नकोसे वाटू लागतात. त्यांची अडचण होते आणि त्यांना वृ’द्धाश्र’मात ठेवण्याचा पर्याय निवडतात. इतके वाईट करूनही आई वडिलांचं प्रेम हे निस्वा’र्थी असते. कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता प्रेम करणारे ते ईश्वर असतात. अशीच मनाला चटका लावणारी एक गोष्ट आपल्याला पहायची आहे….

नेहमी प्रमाणे रितेश कामाला गेलेला असतो, पण आज त्याला यायला खूप वेळ झालेला असतो, खूप म्हणजे दुसरा दिवस उगवण्याची वेळ झाली. त्याची बायको घरी वाट पाहत होती. रात्रीचे बारा वाजून गेले होते. रितेश घरी पाय ठेवतो इतक्यात त्याची पत्नी कुठे गेला होता ? तुम्हाला आज इतका लेट का झाला यायला.असे घर विसरण्या सारखे कोणते काम होते? ऑफिस मधून तुम्ही उशीर घरी येण्यासाठी निघाला होता मग इतका वेळ कुठे होता?

रितेशला काहीच बोलू देत नव्हती, तर तेवड्यातून रितेश बोला अग आईला आणायला गेलो होते. हे ऐकल्यावर तर त्याची पत्नी जास्तच भ’डकली. कशाला आणलं तुम्ही त्यांना, तिथंच तुमच्या भावाकडे राहायला द्यायचं होत ना, आपले इथे आदीच खायचे वां’दे त्यात त्यांची आणि भर. तुमच्या तु’टपुं’ज्या दहा हजार च्या पगारात काय आणि कसं चालवायचं कळत नाही आणि तुमची आई का आली आहे इथे ? ला’ज वाटत नाही का तिला अशी तिची बडबड सुरू होती. रितेशच ती काहीच ऐकून घेत नव्हती.

आई अजून बाहेरच अं’धारात डोळे पुसत उभी राहिली होती. ती जेव्हा बाहेरची लाईट लावते आणि बाहेर डो’कावुन बघते आणि तिला ध’क्काचं बसतो. तिचे डोळे पाण्याने ड’बडतात, ती आईचे डोळे पुसते आणि आपलेही डोळे पुसते आणि आईला आत घेते. आता कोणत्या तोंडानी रितेशला काय बोलायचं हे तिला समजत नव्हते. त्याच्याशी नजर सुद्धा मिळवता येते नव्हती, कारण… ती रितेशची आई नव्हती तर रितेशच्या पत्नीची आई होती. मग तिने आपल्याला आईला हातपाय धुऊन ये बोल्ली.

तू सकाळपासून काहीच खाल्लं नसशील. मग आई बोलते की तुझे दादा आणि वहिनी मला खूप त्रास देत आहेत म्हणून मी जावईबापूना फोन करून बोलावून घेतले. आणि मग मी इथे आले. हे सर्व ऐकून तिला रडू आले. तुम्ही खुप मोठ मला सरप्रा’ईज दिले आज असे नजर खाली घालून ती बोलू लागली. मला आईला भेटून खूप बरं वाटल असे ती रितेशला बोली. थँक्स !! तुम्ही तिला इथे घेऊन आला.

पण तिला तिची चूक उम’गली होती. त्यामुळे कोणत्याही आईचे दुःख हे मोठेच असते. कोणाचीही आई असली तरी ती आईच असते. आईच्या आनंदाचे कारण तिची मुलेच असतात. जर मुलांना आईच्या आनंदाचे कारण नाही बनता येत तर त्यांचे दुःखाचे कारण तर बनू नये.