पळून जाऊन लग्न केलेल्या मुलीच्या नवऱ्याच्या अपघात…..अपघातानंतर त्या मुलीच्या आयुष्यात जे घडले ते पाहून थक्क व्हाल……!

लाईफ स्टाइल

माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर, माणुसकी म्हणजे निस्वा’र्थपणे माणसातील माणूस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात पुढे करणे म्हणजे माणुसकी आहे. आपले खरे व्यक्तिम’त्त्व हे आपले खरे वै’शिष्ट्य आहे. प्रेम, दया, प्रामाणिकपणा, चांगुलपणा, करुणा हे सर्व आपले गुण आहेत.

स्वतःचा विचार न करता इतरांच्या बाबतीत विचार करणे. जगात आपण ज्या घडामोडी बघत आहोत आणि जे चालले आहे आणि समोर आपल्याला दिसते की, माणुसकी संपत चाललेली आहे आणि आपल्या मनुष्याचे कॅरे’क्टर इतके तळाला चालले कधी तर खरंच असे वाटते जनावर आपल्या पेक्षा बऱ्याच पटीनी चांगले आहेत. “माणुसकी ही जगासाठी सर्वात मोठी गरज आणि आवश्यकता आहे आणि मानवतेपेक्षा मोठा ध र्म नाही”.

आज आपण अशी एक गोष्ट पाहणार आहे यावरून कळेल की आजही माणसात माणुसकी जि’वंत आहे…..!

समीर आणि स्मिता यांनी घरच्यांच्या विरुद्ध जाऊन प्रेमविवाह केला होता. समीर, स्मिता आणि त्याची आई हे तिघे एकत्र राहत होते. स्मिता ने पळून जाऊन लग्न केल्यामुळे तिच्या घरच्यांनी तिच्याशी असणारे सगळे सं’बध तोडून टाकले होते. समीर आणि स्मिता हे पुण्यामध्ये राहत असत. समीर जॉब ला होता पण तो त्या नोकरी ला कंटाळला होता. समीर ने दुसरी नोकरी शोधली होती.

तो नोकरी मिळाली या नादात तो खूपच खुश होता. त्याला चांगल्या पगाराची नोकरी आणि ते पण पुण्यातच त्यामुळे त्याचा आनंद कशात मावत नव्हता. त्यामुळे समीर हा घरी जाताना रस्त्यावरुन गाणे गुणगुणत चालला होता. मस्त पाऊसाच्या सरी कोसळून गेल्या होत्या. समीर हा अगदी बि’नधा’स्त गाडी चालावत असताना अचानक एक समोर वळण आले आणि त्याचा पाय अकसि’लेट वरून खाली दबला गेला आणि क्षणात काय घडले हे त्याच त्याला काहीच कळले नाही.

समीर चा अ’पघा’त झाला होता त्याला एका मोठ्या हॉस्पिट’लमध्ये ऍ’डमिट केले होते. त्याला कळलेच नाही की त्याला अपघा’त कसा झाला होता. समीर तब्बल गेली दहा दिवस झाले शु’द्धीत नव्हता दहाव्या दिवशी त्याला शु’द्ध आली पण डोळे उघडले तर समीर ला समोर एक नर्स दिसली त्याने तिच्याकडे पाणी मागितले. तेव्हा त्या नर्स ला आनंद झाला आणि ती डॉक्टरांना कॉल करून सांगितले.

समीर ला जेव्हा जा’ग आली तेव्हा त्याच्या नाकातोंडात नळ्या होत्या, ऑ’क्सिजन लावला होता. समीर ला कळलेच नव्हते की तो दहा दिवसांनी शु’द्धीवर आला हे जेव्हा त्याच्या लक्षात आले तेव्हा तो सुन्न झाला होता. नवीन नोकरी अत्ताशी पदरात पडली होती त्याच्या आणि सगळं होत्याच नव्हतं झालं होतं. या चिं’तेत तो खूप अस्व’स्थ होता त्यात एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तो ऍ’डमिट होता त्याच बिल किती जास्त झालं असेल या सगळ्या चिं’तेने तो त्र’स्त होत होता.

एकदा स्मिता आणि त्याची आई त्याला भेटायला हॉ’स्पिटलमध्ये आली त्याला बघुन दोघीही खूप आनंदित झाल्या होत्या. स्मिता कहीतरी बडबडत होती तेवढ्यात समीरच्या आईने तिला खु’णावले हा प्रकार समीरच्या लक्षात आला तो विचारणार इतक्यात दोघीही तेथून निघून गेल्या. त्या नर्स शी काहीतरी बोलल्या आणि डॉक्टर सुद्धा अधून मधून चेक करायला यायचे.

महिना होत आलेला होता समीर ला हॉस्पिटल च्या बिलाची चिं’ता लागली होती. स्मिता आणि आई ला विचारताच त्यांनी सांगितले की ‘पैशाची काळजी नको करुस आहेत आमच्याकडे’. समीर ला काहीच कळत नव्हते या दोघींनी जमवले कुठून? समीर चा सं’यम सुटत चालला होता पैशाच्या विचाराने. पण अचानक साठीच्या वयामध्ये असणारे वृ’द्ध भेटून समीर ला त्याच्या त’ब्बेतीची चौकशी केली.

त्या माणसाचं नाव ‘मेहता’ होत त्याला काहीच कळत नव्हते हा माणूस माझी का इतकी चौकशी करतोय. त्याने हा सगळा प्रकार स्मिता च्या कानावर घातला आणि सांग नेमके काय चाललंय? अस बोलला, ती सांगू लागली की ‘जेव्हा तुझा अपघा’त झाला तेव्हा एका अर्धां’ग वायू झालेल्या वृ’द्ध महिलेला एक नर्स फे’रफ’टका मा’रण्यासाठी बाहेर आली. रस्त्यावर उतार असल्यामुळे तुझ्या गाडीने तिला जोरात ध’डक दिली.

नर्स लांब उडाली पण तिला काहीच झालं नाही पण बि’चारी ती वृ’द्ध स्त्री याच दवाखान्यात ऍ’डमिट होती. तू आणि ती महिला तुम्ही दोघेही मृ’त्यूशी दहा दिवस झुंज देत होता. पण ती वृ’ध्द महिला तुझ्या आधी एक दिवस शु’द्धीवर आली तिने तिच्या नवऱ्याला सांगितले की मी गेल्यावर त्याच्यावर केस नका टाकू उलट त्याचे आभार मानायला पाहिजे. मी जे अनेक वर्षे श’रीराचे भो’ग भो’गले त्याची देवालाच दया आली असेल, आणि त्यानेच या समीरला पाठवलं असेल मला मुक्ती देण्यासाठी.

माझी शेवटची इच्छा आहे की त्या बि’चाऱ्याचे बिल तुम्हीच भरा. असे म्हणून ती दे’वाघरी गेली. तिला एकच मुलगी आहे ती पण कॅनडा मध्ये इथे त्यांचं कोणीच नाही. त्यांनी समीर ला मुलगा मानला आणि त्याचे पाच लाखांचे बिल त्यांनी भरले होते. समीर ला हे ऐकून ध’क्का च बसला त्याचा विश्वास बसत नव्हता की या जगामध्ये अशी माणसे अजूनही शिल्लक आहेत.

हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर मेहता हे त्यांच्या घरचा – सं’साराचा एक भाग बनले. काही दिवसांनी त्यांना सुद्धा मृ’त्यू आला. या घटनेवरून कळते की माणुसकी शिल्लक आहे कुठेतरी.