पद्मनाभस्वामी मंदिराचा सातवा दरवाजा उघडणार हा एकमेव सान्यासी, ज्याच्याकडे आहे अधभूत… आतापर्यंत कोणीही उघडू शकले नाही तो दरवाजा उघडणार… जाणून घ्या काय आहे या रहस्य मागचे रहस्य

धार्मिक

आपल्या भारत देशात अनेक अद्भूद चमत्कारिक,रहस्यमय, थक्क करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. भारतीय संस्कृती आणीन प्राचीन परंपरा जपणारी मंदिरे यात सर्वात आघाडीवर आहेत. देशातील सर्वोच्च संपत्ती मंदिरांपैकी एक आहे केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिर. हे मंदिर केवळ मालमत्तेमुळेच नाही तर त्याच्या रहस्यमयतेमुळेही चर्चेत राहिले आहे. येथे गुप्त तळघरां मध्ये इतका खजिना दडलेला आहे, ज्याचा कोणी अंदाजही लावू शकत नाही असा विश्वास आहे.

या मंदिराला अशे सात दरवाजे आहेत. यात सहा तळघरांचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत पण सातवा दरवाजा अजूनही उघडलेला नाही. या दारामागचे काय रहस्य आहे.चला तर मग जाणून घ्या. कोणताही ठोस पुरावा नाही कि मंदिर कधी बांधले गेले आहे. हे मंदिर सुमारे ५००० वर्षे जुने आहे असे इतिहासकार डॉ. L.A रवी वर्मा यांच्या मत आहे.

कलियुगात जेव्हा मानवी सभ्यता पोहोचली. तसे, असे मानले जाते की मंदिराच्या संरचनेच्या दृष्टीने केरळच्या तिरुअनंतपुरम येथे बांधलेले पद्मनाभस्वामी मंदिर सोळाव्या शतकात त्रावणकोरच्या राजांनी स्थापन केले होते. इथल्या राजांनी या मंदिरावर तेव्हापासून विश्वास ठेवला. महाराजा मार्तंड वर्माने स्वतःला पद्मनाभ दास म्हणून 1750 साली घोषित केले. संपूर्ण राजघराणे मंदिराच्या सेवेत यामुळे गुंतले.

राजघराण्यातील खाजगी ट्रस्ट आताही मंदिराची देखभाल करत आहे. विष्णूला समर्पित असलेले हे मंदिर आहे. राजांनी येथे अमाप संपत्ती लपवली होती असे या मंदिराबद्दल म्हटले जाते जेणेकरून ती काही गरजांसाठी उपयोगी पडेल. मंदिराला सात गुप्त कोठडी आहेत. प्रत्येक अंधार कोठडीला एक दरवाजा जोडलेला आहे. एकापाठोपाठ सहा तळघर सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली उघडण्यात आले.

एकूणच, 1 लाख कोटींपेक्षा जास्त किमतीचे सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने येथून सापडले आहेत, आणि ते मंदिराच्या ट्रस्टकडे ठेवले आहेत. यात श्रीविष्णूंची साडेतीन फूट लांबीची सोन्याची मूर्ती मिळाली होती. श्रीविष्णूंना अनेक प्रकारची रत्ने, होईरे अर्पण करण्यात आली होती. याशिवाय १८ फूट लांबीची सोनसाखळी मिळाली होती.तसेच मोठ्या प्रमाणात हिरे, किमती रत्नांचे भंडार यात सापडले होते.

परंतु दरवाजावर नागांची एक भव्य आकृती कोरलेली आढळून येते शेवटच्या आणि सातव्या दरवाजाजवळ पोहोचल्यावर. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न त्यामुळे थांबला. स्वतः भगवान विष्णूच्या अवताराने नाग देव या दरवाजाचे रक्षा करत आहेत आणि ते उघडल्याने काही मोठी संखट येऊ शकते असे मानले जाते. मंदिरावर विश्वास ठेवणार्‍या लोकांचे असे म्हणणे आहे की, न्यायाधीश टीपी सुंदर राजन यांच्या अध्यक्षतेखाली दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

त्या नंतर त्यांचा अचानक निधन झाले. मंदिराचे दरवाजे उगडण्याचा हा श्राफ आहे असे लोक म्हणतात. Travancore: A guide book for the visitor या मार्गदर्शक पुस्तकात इतिहासकार आणि पर्यटक एमिली हॅच यांनी या मंदिराच्या दाराशी संबंधित एक संस्मरण लिहिले आहे. हजारो सापांनी मंदिराच्या तळघरांना घेरले होते जेव्हा १९३१ मध्ये दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला जात होता असे तिनी लिहले आहे.

1908 मध्ये देखील यापूर्वी हे घडले आहे. हे रक्षक साप कित्येक शतके जमिनीखाली राहत होते, जे अचानक सक्रिय झाले तसेच हे साप राहत असलेले काही गुप्त ठिकाण आहे का..? असे प्रश्न देखील उद्भवले आहेत. आता खाजगी ट्रस्ट राजघराण्यांतर्गत मंदिराची देखभाल करत आहे. हा सातवा दरवाजा लाकडाचा बनलेला आहे.

आणि तो दरवाजा कसा आहे, जो अजूनही रहेस्य आहे..? तो दरवाजा उघडण्यासाठी व बंद करण्यासाठी चेन, नट-बोल्ट, चेन किंवा लॉक नाही. शास्त्रज्ञांसाठी अजूनही एक गुपित कळले नाही कि हा दरवाजा कसा बंद आहे. असे मानले जाते की काही मंत्रांच्या पठणाने शतकांपूर्वी ते बंद केले होते आणि आता कोणीही ते उघडू शकत नाही. तज्ञांचा असा विश्वास आहे की दरवाजावर दोन सापांचा आकार पाहता,

तो नाग पाशम सारख्या मंत्राशी बांधला गेला असावा आणि गरुड मंत्राचा जप करूनच तो उघडला जाऊ शकतो. परंतु हे मंत्र उच्चारणे इतके कठीण आहे की थोडीशी ही चूक झाली तर जीव जाऊ शकते असे मानले जाते. या कारणामुळे आजपर्यंत ते उघडण्याची कोणी ही धाडस केले नाही. तर अशी आहे पद्मनाभस्वामी मंदिराची कहाणी.