पचनाचा त्रास होत असेल तर आजपासून करा ही एक गोष्ट! पचनशक्ती खूप मजबूत होईल… गॅस, पित्त, अपचन कधीच होणार नाही!

आरोग्य

मित्रांनो, अनेकवेळा आपल्याला आरोग्याबाबत अनेक प्रकारच्या विचित्र अशा काही समस्येला सामोरे जावे लागत असते. अशा वेळी आपल्या पुढे ही एक भयंकर समस्या निर्माण झालेली असते. पण तुम्ही त्या साठी काही करू देखील शकत नाही. कारण समस्या ही आरोग्याची असते. मित्रांनो, अपचन, गॅस अ‍ॅसिडिटी इ. अशी समस्या प्रत्येकाला नेहमीच होत असते. बरेच लोक म्हणतात की आम्ही नेहमी जेवताना साधा भात, पालेभाज्या आणि इतर काही भाज्या असच खात असतो, पण तरी देखील आपल्याला अपचनाचा सतत त्रास होत असतो.

अशा वेळी बरेच लोक विचारतात की त्यांनी या बाबत खरोखर काय करायची गरज आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला एक सोपा उपाय सांगणार आहोत. अपचनासाठी सामान्य वाटणाऱ्या समस्या अनेकदा खूप त्रासदायक असू शकतात. जर तुम्हाला अशा प्रकारचा त्रास होत असेल तर समजून घ्या की तुमची पचनशक्ती खूप कमकुवत झाली आहे.

अनेकवेळा खाल्ल्यानंतर सुद्धा ढेकर हे येतच राहते. खाल्ल्यानंतर बद्धकोष्ठता ही देखील आरोग्याची एक गंभीर समस्या आहे. जर तुम्हालाही ही समस्या असेल तर याचा अर्थ तुमची पचनशक्ती खूपच कमजोर आहे. खराब पचन शक्ती निर्माण होण्याची अनेक कारणे आहेत. खराब पचन होण्याचे पहिले कारण म्हणजे पाण्याची कमतरता.

जर तुम्ही खूप कमी पाणी प्यायले तर तुमची पचनशक्ती खूप कमकुवत होईल आणि तुम्हाला अशा प्रकारची समस्या वारंवार निर्माण होईल, त्यामुळे तुम्ही दिवसभर भरपूर पाणी प्यावे. जेणेकरून तुम्हाला असा काही त्रास होणार नाही. खराब पचनाचे आणखी एक कारण म्हणजे जास्त किंवा अतिरेक खाणे होय. मांस खाणे आरोग्यासाठी विशेष आणि उपयुक्त मानले जाते.

पण जास्त मांस खाल्ल्याने पचनशक्ती कमकुवत होते आणि तुम्हाला या सारख्या अनेक गोष्टी पचणे कठीण होते. त्यामुळे या गोष्टींचा वापर शक्य तितका कमी केला पाहिजे. बरेच लोक जेवताना पाणी पितात, त्यामुळे त्यांची पचनशक्तीही कमजोर होते. दुसरे कारण म्हणजे आपण म्हातारे होत आहोत, म्हणजेच वाढत जाणारे वय हे आहे.

वयानुसार तुमची पचनसंस्था कमकुवत होत जाते. तुम्हालाही तुमची पचनसंस्था मजबूत करायची असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. ज्यामुळे तुमची पचनक्रिया चांगली राहते आणि वर सांगितलेली समस्या येणार नाही. तसेच या समस्याही कमी होतील. काही गोष्टींची काळजी घेतल्यास पचनाच्या समस्यांवर मात करता येते.

यासाठी रोज किमान खावे म्हणजेच कमीत कमी खाण्याचा प्रयत्न करावा. याचा अर्थ असा की प्रत्येक रात्री तुम्ही जेव्हा जेवता, त्यावेळी तुमचे पोट हे 80% भरलेले असेल, त्याची काळजी घ्या. कारण जास्त खाल्ल्याने पचनात मोठी अडचण येते. यामुळे पोटाच्या अनेक समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे सावकाश, शांतपणे आणि माफक प्रमाणात खा.

आपल्या आहारात काही फळांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. आपल्या आहारात संत्रा, ब्रोकोली, किवी, स्ट्रॉबेरी इत्यादी फळांचा समावेश केल्यास पचनक्रिया मजबूत होते. हे सर्व व्हिटॅमिन सीचे स्त्रोत आहे. यामुळे तुम्हाला व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळते. त्यामुळे अपचनही कमी होते.

त्यामुळे तुम्हालाही अशा प्रकारची समस्या असेल तर याचे सेवन तुम्ही जरूर करा. जर तुम्हाला हा वर दिलेला लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसह शेअर करायला अजिबात विसरू नका. तसेच, अशा आणखी काही अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा बिलकुल विसरू नका.

अस्वीकरण: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय हे पूर्णपणे सामान्य माहितीवर आधारित आहेत. त्याचबरोबर आमची वेबसाइट या गोष्टींची पुष्टी करत नाही. हा उपाय करण्यापूर्वी तूम्ही कृपया संबं’धित तज्ञांचा नक्कीच सल्ला घ्या.