देव नेहमी चांगल्या लोकांनसोबत वाईट का वागतो..? स्वामी समर्थांनी बघा काय उत्तर दिले…

धार्मिक

श्रीस्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या मनात विचार येतो की, तुम्ही कोणाचेही नुकसान केले नाही, तरी माझ्याशी इतके वाईट का होत असते? मी नेहमी देवावर विश्वास ठेवतो, त्याची सेवा करतो, मी योग्य मार्गावर चालतो, चांगली कामे करतो, पण तुमच्या मनात खूप विचार येतात की माझ्यासोबत च असे वाईट का होते. आणि असे विचार अनेक लोकांच्या मनात येतच राहतात.

अशा सर्व प्रश्नांची उत्तरे स्वामी समर्थांनी दिली आहेत. एकदा अर्जुनाने कृष्णाला विचारले की वासुदेव नेहमी खऱ्या आणि चांगल्या लोकांसोबत इतके वाईट का वागतात? आणि यातच सर्व मानवांच्या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढे याचे उत्तर देताना कृष्ण म्हणतो की, एका शहरात दोन पुरुष राहत होते. पहिला व्यापारी आणि चांगला माणूस होता. धर्म आणि नैतिकता पाळत होता, सत्कर्म करत होता, देवपूजा करायचा, मंदिरात जाऊन देवाची सेवा करत होता.

सर्व गैरकृत्यांपासून दूर रहात होता. आणि दुसरा माणूस उद्धट होता. वाईट गोष्टी करणे, खोटे बोलणे, नेहमी वाईट गोष्टी करणे आणि अधर्म करणे हेच तो नेहमी करत होता. तो नेहमी मंदिरातून चप्पल आणि पैसे चोरायचा. वाईट संगतीत होता आणि व्यसनी सुद्धा होता. एके दिवशी मुसळधार पाऊस सुरू झाला आणि मंदिरात कोणीच नव्हते. दुष्ट माणसाने मंदिरातील सर्व पैसे चोरले आणि पळून गेला.

काही वेळातच एक चांगला व्यापारी मंदिरात जाण्याच्या उद्देशाने तेथे आला. त्यामुळे लोकांनी त्याच्यावर चोरीचा आरोप केला. तेथे उपस्थित सर्व लोकांनी त्याला चोर म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, खूप अपमानित केले. तिथून कसाबसा मंदिरातून तो बाहेर पडला होता. तेथून कसेतरी बाहेर आल्यानंतर त्याला एका बैलाने मारले. तो गं’भीर ज’ख’मी झाला आणि पुढे जात असताना त्या दुष्ट माणसाला पैशांनी भरलेली दुसरी बॅग सापडली.

तो विचार करू लागला की आजचा किती चांगला दिवस आहे की मला मंदिरातून सुद्धा पैसे मिळाले आणि आता पण परत पैसे मिळाले. जखमी तरुणाला हे कळताच तो घरी आला. त्याने घरी येऊन आपल्या घरातील सर्व देवतांच्या मूर्ती आणि फोटो काढून टाकले आणि तो देवावर रागावून बसला आणि तसच राहू लागला. बर्‍याच वर्षांनंतर, चांगला माणूस आणि वाईट माणूस मरण पावला. मग तो यमराजांसमोर गेला आणि त्या गृहस्थाने यमराजांना प्रश्न विचारला.

मी नेहमीच चांगले काम केले आहे, मी कोणाचे वाईट केले नाही तरीही मी दुःखी का आहे? माझा असाच अपमान का झाला? आणि यमराज त्याला उत्तर देऊ लागले. ज्या दिवशी बैलाने तुला मारण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी तूझा मृत्यू हा निश्चित होता. पण त्या मृत्यूने तुला घायाळ केले आहे. आणि त्या दुर्घटनेतून तू थोडक्यात बचावलास आणि त्या दुष्टाला राजयोग मिळणार होता.

पण फक्त त्याच्या कडून झालेल्या वाईट कर्मामुळे त्याचा राजयोग हा धन्याच्या पोत्यात बदलला गेला. देव तुम्हाला कशा प्रकारे साथ देतो हे सांगणे खूपच कठीण आहे. पण आपल्या चांगल्या वाईट कर्मांपासून तुम्ही दूर राहत असता. म्हणून तुम्ही ज्या कोणाची सेवा करत आहात. तुम्ही ज्याची उपासना करता त्याची कृपा तुमच्यावर नक्कीच आहे. तुम्ही संकटात, दुःखात, किंवा तुमच्यासोबत काहीही झाले तरी देव तुमच्या सोबत नाही असे कधीही समजू नका.

पण तुमच्या आणि तुम्ही केलेल्या सेवेमुळे, आणि तसेच तुमच्या अनेक चांगल्या कर्मामुळे हे सर्व तुमच्याबाबतीत चांगले झाले आहे. तर मित्रांनो जर तुम्हाला नेहमीच अस वाटत असेल की माझ्यासोबत च प्रत्येक वेळेला वाईट का होत असते. मी तर नेहमीच चांगले आणि योग्य कर्म करत असतो, तर मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे जे काही वाईट तुमच्यासोबत झाले आहे त्याच्यापेक्षा जास्त वाईट कदाचित तुमच्याबरोबर होणार होते.

मात्र तुमच्या द्वारे केल्या गेलेल्या चांगल्या कर्मामुळे, आणि तुमच्या योग्य सेवेमुळे ते अगदीच कमी प्रमाणात तुमच्यापर्यंत आले आहे हे असे समजून तुम्ही तुमचे आयुष्य भरभरून जगा. माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी खालील फेसबुक लाईक बटणावर क्लिक करा.

टीप: वरील माहिती अनेक स्तोत्रांवर आधारित आहे. याचा अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्टचा एकमेव उद्देश तुम्हाला समाजात स्वीकारलेल्या मान्यतांची जाणीव करून देणे हा आहे. गैरसमज करून घेऊ नका

तुम्हाला अजून काय वाचायला आवडते ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आम्हाला अधिक प्रोत्साहन देते. जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट मिळत राहतील आणि आमचे फेसबुक पेज देखील नक्कीच शेअर करा. धन्यवाद….