जेव्हा जगन्नाथ मंदिरामध्ये कॅमेरा लावण्यात आला तेव्हा कॅमेऱ्यात असे काही दिसले की.. पाहून सर्वांनाच धक्का बसला.. बघा रहस्य..

धार्मिक

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, भारतामध्ये अशी अनेक मोठ-मोठी मंदिरे आहेत आणि या मंदिरांमध्ये काही ना काही रहस्य दडलेले आहे. आज आपण अशाच एका मंदिराची गोष्ट पाहणार आहोत. ही गोष्ट आहे “जगन्नाथ पुरी” या मंदिरात घडलेली. काही दिवसांपूर्वीच जगन्नाथ पुरी या मंदिरात एक विचित्र अशी घटना घडली होती. मंदिराचे पुजारी आणि अधिकारी लोक स्वयंपाक घरात गेले आणि त्यांनी समोर जे पाहिलं,

आणि पाहून आश्चर्यचकित झाले. त्या स्वयंपाक घरात असे काही झाले होते जे या आधी ८०० वर्षे पूर्वीपासून झाले नाही. तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांना असे वाटत होते की, भगवान जगन्नाथ कुठलीतरी वाईट गोष्ट होण्याचे संकेत देत होते. या गोष्टीची सूचना जेव्हा पो’लिसांना देण्यात आली, पो’लिस तेथे आल्यावर त्यांनी तेथे असलेल्या सी सी टीव्ही कॅमेरामध्ये तपासणी केली असता,

त्यांना तेथे जे दिसले ते पाहून सर्वजण चकित झाले. भारतातल्या चार धामपैकी एक धाम आहे “जगन्नाथ धाम”. जगन्नाथ धामशी सं’बंधित असे काही रहस्य आहेत जे आजपर्यंत कोणीही सोडूवू शकले नाही. भगवान जगन्नाथ चे हे मंदिर किमान ८०० वर्षांपूर्वीचे आहे असे मानले जाते. परंतु आता या मंदिरात अशा काही गोष्टी घडतात ज्यांना भविष्यात येणाऱ्या अशुभ गोष्टींचे संकेत मानलं जात आहे.

जगन्नाथ मंदिराच्या स्वयंपाक गृहाला भारतातील सर्वात मोठे स्वयंपाक घर मानले जाते. स्वयंपाक घर मंदिराच्या दक्षिण दिशेला आहे. या स्वयंपाक घरातून भगवान जगन्नाथ यांना दाखवणारा नैवेद्य तयार केला जातो. हा महाप्रसाद तयार करण्यासाठी या स्वयंपाक घरात ५०० स्वयंपाकी आणि ३०० मदतनीस आहेत. असे मानले जाते की,

तेथे बनवला जाणारा नैवेद्य माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी यांच्या देखरेखी खाली केला जातो. या नैवेद्यामध्ये कांदा लसूण वापरला जात नाही. हा नैवेद्य बनवण्यासाठी मातीची भांडी आणि मातीच्या चुलीचा वापर केला जातो. या स्वयंपाक घराच्या बाजूलाच दोन विहिरी आहेत ज्यांना गंगा आणि यमुना म्हटले जाते त्या विहिरींचे पाणी नैवेद्यासाठी बनवल्या जाणाऱ्या स्वयंपाकात वापरले जाते.

एके दिवशी हिच मातीची भांडी आणि मातीच्या चुली यांची तोडफो’ड केलेली आहे असे दिसून आले. हा सर्व प्रकार पाहून तेथे जमलेल्या पुजाराने पो’लिसांना बोलवले पो’लीस तेथे येऊन सी सी टीव्ही कॅमेरा ची तपासणी केली असता त्यांना असे दिसले की, एक माणूस स्वयंपाक घरात येऊन भांड्यांची तोडफो’ड करत आहे. पो’लिसांनी त्या माणसाला शोधून काढले आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, येथे बनवल्या जाणाऱ्या महाप्रसादात खूप मोठे राजकारण होत आहे.

तेथे बनवला जाणारा प्रसाद भक्तांपर्यंत पोहोचत नाही. काही लोक यामध्ये राजकारण करून स्वतःचा फायदा मिळवत आहेत. पुरी येथील जगन्नाथ मंदिर जिथे स्वतः विष्णू जगन्नाथाच्या रूपात वास करतात. अशा मंदिरामध्ये होणाऱ्या अशा घटना भविष्यामध्ये येणाऱ्या अशुभ गोष्टींचा संकेत आहे असे मानले जात आहे. आज मनुष्य आपल्या स्वार्थासाठी भगवंताचे मंदिर सुद्धा आपल्या स्वार्थासाठी वापरत आहे. मित्रांनो आयुष्यात एकदा तरी जगन्नाथ पुरी या मंदिराचे दर्शन नक्की करा.

या मंदिरात घडलेल्या घटना आणि रहस्य तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करतील. परंतु या मंदिरात मागितलेल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.