जाणून घ्या…अगरबत्ती व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती..! छोट्या प्रमाणात चालू करून तुम्ही लको रुपय कमवू शकता…मिडल क्लास लोकांसाठी योग्य वेवसाय एकदा बघाच कसा असतो…

बातम्या सामान्य ज्ञान

अगरबत्ती ही एक अशी वस्तू आहे जी भारतातील जवळजवळ प्रत्येक समुदायामधील लोक नेहमीच वापरत असतात. आणि अगरबत्ती बनवणे ही गोष्ट सुद्धा एक खूप सोपे काम आहे. अगरबत्तीचा व्यवसाय हा एक छोटासा व्यवसाय आहे. ज्याची सुरुवात तुम्हाला अगदीच कमी गुंतवणुकीने सुद्धा करता येते. लहान व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यामुळे तुम्ही तुमच्या घरापासून याची सुरुवात करू शकता. आणि जर तुम्हाला तुमचा स्वतःचा असा एक ब्रँड तयार करायचा असेल यामुळे तुम्हाला जागा, मशीन, कर्मचारी आणि असे बरेच काही आवश्यक असेल.

भारतीय घरांमध्ये सुगंधासाठी अगरबत्ती वापरली जाते. हे कीटकनाशक म्हणूनही काम करते. तसेच त्यात अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत. आणि याच कारणाने ते सर्व लोकांमध्ये अधिकाधिक लोकप्रिय होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. धार्मिक असो वा सामाजिक कार्य असो, उदबत्तीचा वापर हा सर्वत्र आवश्यक असाच आहे. तसेच त्याची मागणी ही वर्षभर चालूच राहते. त्याच वेळी, सणासुदीच्या काळात त्याची मागणी ही दुप्पट होत असते. अगरबत्ती व्यवसाय सुरू करण्याचे दोन मार्ग आहेत.

1. एक लहान व्यवसाय म्हणून : जर तुमचे बजेट हे अधिक जास्त प्रमाणात किंवा गरजेपुरते उपलब्ध नसेल आणि त्यासोबत अगदीच कमी खर्चामधे जर हा अगरबत्ती चा व्यवसाय तुम्हाला चालू करायचा असेल तर तुम्ही तो व्यवसाय एक छोटा व्यवसाय म्हणून देखील सुरू करू शकणार आहात आणि या प्रकारचा व्यवसाय तुम्हाला घरबसल्या देखील सुरू करता येतो. तुम्हाला स्वतंत्रपणे जागा खरेदी करण्याची गरज नाही. यामुळे मशिन, नोंदणी, कर्मचारी इत्यादीवरील पैशांचीही बचत होईल. छोट्या व्यवसायात तुम्हाला फक्त कच्च्या मालामध्ये गुंतवणूक करावी लागेल, म्हणजे तुम्हाला फक्त 12 ते 20 हजार रुपये द्यावे लागतील.

2. एक मोठा व्यवसाय म्हणून : ज्यांचे बजेट अधिक आहे. त्यांचा अगरबत्तीचा मोठा व्यवसाय सुरू होतो. त्यासाठी त्यांना कच्चा माल आणि जागा वेगळी खरेदी करावी लागेत असते आणि त्यांना मशिन्स आणि कामगारांची सुद्धा गरज लागत असते. यासाठी अनेक परवाने आणि नोंदणी देखील आवश्यक आहेत. आणि या प्रकारच्या व्यवसाया साठी तुम्हाला 5 ते 6 लाख रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे.

अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय तुम्ही कसा सुरू कराल..??

1.व्यवसाय योजना तयार करा : व्यवसाय बँड म्हणून स्थापित करण्यासाठी योग्य योजना असणे ही गोष्ट खूप महत्वाची आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला तुमचा अगरबत्तीचा हा व्यवसाय अधिक पुढच्या स्तरावर न्यायचा असेल तर त्यासाठी हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वीच त्याचे चांगले नियोजन करा.
2.अगरबत्ती व्यवसायासाठी आवश्यक : एक गुंतवणूक प्रकारचा इन्व्हेस्टमेंट अगरबत्ती स्टिक्स चा व्यवसाय आहे, आणि यासाठी तुम्हाला पैशाचे व्यवस्थापन करणे आवश्यक असणारं आहे. त्याच प्रमाणे हा व्यवसाय घरी बसून सुरू करण्यासाठी फक्त कच्च्या मालाची तुम्हाला गरज लागणार आहे. ज्यावर तुमचे 12 ते 20 हजार रुपये खर्च होतील. जर तुम्हाला हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करायचा असेल आणि तुमच्याकडे जास्त पैसे नसतील तर कंपनी सुरू करण्यासाठी तुम्हाला 5 ते 6 लाख रुपये गुंतवावे लागतील. त्यामुळे हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यासाठी तुम्ही सरकारकडून मुद्रा कर्ज घेऊ शकता.

3. अगरबत्ती व्यवसायासाठी : जर ह्या व्यवसायाची तुम्हाला एक लहान व्यवसाय म्हणून सुरूवात करायची असेल तर तुम्ही देखील घरी बसून हा व्यवसाय सुरू करू शकणार आहात. पण मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी मात्र तुम्हाला 1000 स्क्वेअर फूट ते 1500 स्क्वेअर फूट इतक्या जागेची आवश्यकता आहे.

4. यंत्रसामग्री : अगरबत्ती व्यवसायात तीन मुख्य प्रकारच्या अगरबत्ती मशीन वापरल्या जात असतात. मॅन्युअल, ऑटोमॅटिक आणि हाय स्पीड ऑटोमॅटिक मशिन्सशिवाय अनेक प्रकारची मशीन्स देखील या मधे वापरले जात असतात. जसे की अगरबत्ती ड्रायर मशीन, आणि त्यांनतर अगरबत्ती पावडर मिक्सर मशीन, त्याच बरोबर अगरबत्ती उत्पादन आणि पॅकेजिंग सुध्दा.

5. कच्च्या मालाची आवश्यकता : अगरबत्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल पुढीलप्रमाणे आहे… कोळशाची धूळ, पांढरा चिप्स पावडर, चंदन पावडर, जिगट पावडर, बांबूची कडी, कागदाची पेटी, परफ्यूम, रॅपिंग पेपर

6. अगरबत्ती कशी बनवायची : चपाती बनवण्यासाठी ज्या प्रकारे पीठ मिसळले जात असते. अगरबत्ती तयार करण्यासाठी कच्चा माल देखील तसच वापरला जात असतो. आणि यासाठी कच्चा माल एका भांड्यात काढून पाण्यात मिसळले जाते. आणि एक लक्षात ठेवा की ते खूप कोरडे किंवा खूप ओले नसावे. कच्चा माल तयार झाल्यावर, तुम्ही स्वतः अगरबत्ती बनवू शकता किंवा तुम्ही मशीन सुद्धा वापरू शकता.

7. अगरबत्ती व्यवसायासाठी परवाना आवश्यक : अगरबत्ती व्यवसाय हा असाच एक व्यवसाय आहे जो की लघु व्यवसायाच्या श्रेणीत येतो. आणि म्हणूनच हा व्यवसाय चालू करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामधील उद्योग केंद्रात जावे लागणार आहे आणि तुम्हाला तुमच्या कंपनीची नोंदणी त्या ठिकाणी करावी लागेल, कंपनीची नोंदणी करण्यासाठी मात्र तुम्हाला 1000 ते 2000 रुपये खर्च येईल.

8. पॅकेजिंग : जर तुम्हाला तुमची अगरबत्ती जलद गतीने विकायची असेल तर त्यामुळे त्यासाठी तुम्हाला त्याचे चांगले पॅकेजिंग करावे लागणार आहे कारण असे अनेक लोक आहेत जे केवळ चांगल्या असणाऱ्या पॅकेजिंगमुळेच त्या वस्तू खरेदी करत असतात.

9. मार्केटिंग : उदबत्त्या पूर्णपणे तयार झाल्या की, तुम्हाला त्याचे मार्केटिंग करावे लागेल जेणेकरुन लोकांना तुमच्या उत्पादनाविषयी माहिती होईल आणि ते त्यांना वापरता सुद्धा येईल. अगरबत्ती विकण्यासाठी, तुम्ही ती ऑनलाइन किंवा ऑफलाइन विकू शकता आणि बाजारात सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याची विक्री करू शकता.ऑनलाइन तुम्ही सोशल नेटवर्किंग साइट्स चा वापर करू शकता, तर ऑफलाइन साठी तुम्ही वर्तमानपत्रे, पैम्पलेट इत्यादी वापरू शकता.

10. फायदा : हा एक असा व्यवसाय आहे ज्यामध्ये की, तुम्ही कमी गुंतवणुकीत अधिकाधिक नफा मिळवू शकता. या व्यवसायात तुम्ही जितक्या जास्त अगरबत्ती बनवाल तितका अधिक नफा तुम्हाला मिळेल. जर मशीनची संख्या ही अधिक जास्त असेल आणि कच्चा माल सुद्धा जास्त असेल तर तुमचा नफा देखील अधिक जास्त असणार आहे. या व्यवसायातून तुम्ही दरमहा सुमारे 25000 ते 30000 रुपये कमवू शकता.