चुकून एक तरुणी पुरुषांच्या डब्यात चढली.. आणि याचाच फायदा घेत एक तरुण तिला कुठेही हात लावत होता.. पुढे काय झालं ते पहा..

लाईफ स्टाइल

नमस्कार मित्रांनो, ही एक मुंबईची गोष्ट आहे. एक मुलगी घाईघाईने पुरुषांच्या डब्यात चढली. यावर काही लोकांनी आरडाओरडा सुरू केला. त्यांना त्यांचा स्वतंत्र महिला डबा दिला आहे ना मग तिकडे जायचं ना. हे आम्हाला महिला डब्यात शिरायला देतील का? त्या मुलीला मात्र रेल्वेने प्रवास करण्याची काही सवय नव्हती हे तिच्या हावभावावरून लगेच दिसून येत होते. ती चुकून त्या डब्यात चढण्याइतकी अडाणी सुद्धा म्हणता येत होती.

ती अस्खलितपणे इंग्रजी बोलत होती आणि व्यवस्थित बोलत होती ती. मुलगी खूप सुंदर होती. ती साधारण तिशीतली होती. तिच्यासोबत कोणीतरी होते, पण तो तिच्यासोबत असणारा व्यक्ती दुसऱ्या डब्यात चढला आणि ती चुकून या जेंट्स डब्यात चढली होती. संध्याकाळचे साडेसात वाजले होते, कामावर जाणाऱ्या लोकांची ही घरी जाण्याची वेळ होती. आणि त्यामुळे प्रवाशांनी तुफान गर्दी होती ट्रेन मधे.

आणि म्हणूनच एवढ्या गर्दीतून काही जण तिला उगाच ढकलून चान्स मारण्याचा प्रयत्न करत होते. गर्दी एवढी होती की ती कोणाशीही काही बोलू शकत नव्हती आणि ती त्या डब्यात मात्र ती एकटीच होती. ती काही न बोलता तिथेच आणि तशीच उभी राहिली होती. तेवढ्यात दारात उभा असलेला एक उनाड तरुण पुढे होऊन त्या मुलीची चौकशी करू लागला. तो तिला बोलला जेंट्स डब्या मधे का आलात तुम्ही? “माझ्या काकांवर मुंबईतील टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत,” ती म्हणाली.

त्यांना भेटण्यासाठी सिन्नरहून आलो आहोत. कल्याणला नातेवाईक असतात आमचे ते सुद्धा माझ्यासोबत आले आहेत. पण ते दुसऱ्या डब्यात चढले आहेत. एकूणच त्याने तिला धीर दिला. पण तिला धक्का देण्याची संधी मात्र त्याने काही सोडली नाही. त्या डब्यामधील काही मंडळींनी मात्र त्या मुलाला चांगलंच हिणवलं होत तर काही मंडळी तर आपणही तिला मारू शकतो का, असा विचार करू लागले होते. मात्र, तिने त्या मुलावर लक्ष केंद्रित केले होते.

आता त्याचा उत्साह अजूनच जास्त वाढला होता. त्याने त्या मुली समोर त्याचे दोन्ही हात धरले जणू तिला मिठी मारावी अशा प्रकारे. त्याला वाटले आता आपण त्या मुलीला लॉजवर घेऊन जाऊ. मात्र त्यानंतर त्या मुलीचे कुटुंबीय तीचा शोध घेत आले. मुलगा पूर्ण फॉर्मात होता. ती शांतपणे उभी राहिली. काहीच बोलली नाही. आणि तेवढ्यात ट्रेन कल्याणला पोहोचली.

त्याने तिला धक्का मारला होता, पण त्याने तिला इतर प्रवाशांपासून दूर ठेवले होते. तो मुलगाही कल्याणलाच राहत होता. जेव्हा तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा त्या मुलीचे नातेवाईक खाली उतरताना पाहून त्याचा संपूर्ण चेहराच उतरला होता. ती चार पावले पुढे चालू लागली आणि पुन्हा वळून त्या मुलाजवळ आली. त्या मुलाला तर असे वाटत होते की आता ती त्याच्यासोबत येत आहे.

पण ती अगदी खालच्या आवाजात त्या तरुणाला म्हणाली, धन्यवाद मित्रा. मित्रा, मी एक प्रोफेसर आहे आणि तुझ्यासारख्या अनेक बिघडलेल्या मुलांना मी वठणीवर आणले आहे. तू मला इतर अनेकांच्या धक्क्यांपासून वाचवलेस. एवढ्या सगळ्यांपेक्षा त्यांच्यापैकी एकाचाच मला धक्का लागला तर काही हरकत नाही असे मी स्वतःला समजावले आणि मला तुझ्याशी अघोषित तडजोड करण्यास भाग पडावे लागले.

मला माहीत होते की त्या गर्दीत तु मला धक्काबुक्की करण्या शिवाय दुसरे काहीही करू शकत नाही आणि मी तुला काही करू सुद्धा देणार नाही. आणि जरीही तू काही करण्याचा प्रयत्न केला असता तर तुला नक्कीच या डब्यातील लोकांनी मारहाण केली असती. तुला वाटलं मी तुझ्याशी सहमत आहे. कोणत्याही मुलीला पाच मिनिटांत पटविण्यासाठी आणि ती मुलगी सहज पटण्यासाठी हा काय चित्रपट आहे का? मित्र हे खरे जीवन आहे.

मित्रा, या एवढ्या गर्दीत आई-बहिणीच्या नजरेतून माझ्याकडे पाहणारे अनेक वडील-भाऊ होतेच ना. त्याला एवढं म्हणून ती तिथून निघून गेली. मात्र तीच हे असं बोलण ऐकून तो तरुण मात्र पुरता शुद्धीवर आला. मित्रांनो, ह्या अश्या अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींमधून आयुष्य आपल्याला रोजच नवनवीन धडा शिकवत असते. पण काहीजण त्यातून चांगल काहीतरी शिकतात, तर काहीजण या येणाऱ्या अनुभवाला वाऱ्यावर सोडतात.