चिकन घरी आणल्यावर ते परत धुणे योग्य आहे का ? दुकानातून चिकन घरी आणल्यावर ते नळाखाली धुणं धोकादायक… एकदा बघा अन्यथा तुमच्या अव-वयला येईल सुज

आरोग्य

कोणताही चिकनचा पदार्थ करण्यापूर्वी चिकन धुणे हे धोकादायक असतं का? संशोधकांनी याचं उत्तर हो असे दिलेलं आहे. आपल्याला असे वाटतं कि चिकन न धुता शिजवणं हे धोकादायक आहे. पण खरं बघायला गेले तर बाजारातून आणलेली चिकन वाहत्या नळाखाली धुण्यात पण काही धोके असू शकतात.

सर्वप्रथम चिकन दुकानातून आणल्या नंतर ते स्वच्छ धुण्यात येतं. त्यानंतर त्यापासून आपला आवडता पदार्थ तयार केला जातो. पण संशोधक असा इशारा देतात की, अशा प्रकारच्या स्वच्छते मुळे फूडड पॉयझनिंग चा म्हणजेच अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता असू शकते.

नळाखाली धुण्याचे धोके – ब्रिटिश फुड स्टँडर्ड एजन्सी (एफसीए) असे म्हणते की, जेव्हा आपण मांस धुतो तेव्हा मांसावर असलेल्या जीवाणूं (बॅक्टेरिया) तुमच्या हाताला संसर्ग करू शकतो आणि ते पोटात पण जाऊ शकतात. कच्च्या चिकनमध्ये सॅल्मोनेला आणि कॅम्पिलोबॅक्टर या नावाचे जीवाणू असू शकतात.

जेव्हा चिकन नळाच्या पाण्याखाली धुतो तेव्हा त्यावर पाण्याची धार पडत असल्यास ते जीवाणू स्वयंपाक घरातील असणाऱ्या भांड्यांवर, आपल्या अंगावरील कपड्यांवर आणि रुमालावर पण संक्रमित होऊ शकतात.

उदा. जेव्हा सिन्कच्या बाजूला जर सुरी असेल तर ज्या पाण्याने चिकन धुतले जात आहे ते पाणी जेव्हा सुरीवर पडते आणि सुरीवर जीवाणू संक्रमित होतात. त्यानंतर आपण त्याच सुरीने आंबा किंवा सफरचंद कापतो आणि ते आपण खातो. याच परिणाम, म्हणजे ते जीवाणू आपल्या पोटात जातात.

कॅम्पिलोबॅक्टर आरोग्याला अपायकारक असतात – कॅम्पिलोबॅक्टर हा एक प्रमुख जीवाणू आहे. अन्नातून निर्माण होणाऱ्या विषबाधेसाठी हा जीवाणू कारणीभूत असु शकतो. कच्च मांस, ताज्या भाज्या आणि शुद्ध न केलेल्या दुधा मधून हे जीवाणू संक्रमित होऊ शकतात.

कॅम्पिलोबॅक्टर जीवाणूचा संसर्ग झाल्यास ते आरोग्याला अपाय होतो. याचा संसर्ग मुळे अतिसार, पोटदुखी, ताप आणि उलट्यांचा त्रास पण होऊ शकतो. हा आजार काही प्रकरणांमध्ये काही दिवसातच बरा होतो. पण काहींना त्यांच्या आरोग्यावर मात्र दीर्घकालीन परिणाम करू शकतो.

इरिटेबल बॉवेल सिण्ड्रोम : इरिटेबल बॉवेल सिण्ड्रोम हे कॉम्पिलोबॅक्टरमुळे होतो. याचा संसर्ग झाल्यास आपल्याला ओटीपोटात वेदना होतात, आपले पोट जड होते, पोटात गॅस धरत, अतिसार होतो आणि बद्धकोष्ठता होते.

गॅम्बेअर सिण्ड्रोम : कॅम्पिलोबॅक्टरमुळे होणारा अजून एक आजार म्हणजे गॅम्बेअर सिण्ड्रोम आहे. या आजारात क्वचित वेळा आपली प्रतिकारक यंत्रणा आपल्या मज्जासंस्थेवर हल्ला करते. कॅम्पिलोबॅक्टर जीवाणू मुळे मृत्यूसुद्धा होऊ शकतो. विशेषतः म्हणजे लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींसाठी हा जीवाणू धोकादायक असू शकतो.

काय काळजी घ्यावी? – चला तर आपण बघूया कि यासाठी काय काळजी घेतली पाहिजे.दुकानातून आणलेलं चिकन, पहिले न धुता सुयोग्य तापमानावर शिजवण्यात आले पाहिजे. चिकनवरील जर रक्ताच्या डाग असेल तर पेपर टॉवेलने ते काढावे. त्यानंतर तो पेपर टॉवेल काळजीपूर्वक कचऱ्याच्या डब्यात टाकून द्यावे.

कच्च मांस फ्रिजमध्ये ठेवताना काळजीपूर्वक ठेवावं. हे मांस इतर पदार्थांमध्ये मिसळलं जाऊ नये याची पूर्णता काळजी घ्यावी. चिकनचे तुकडे करण्यासाठी वापरलेले चॉपिंग बोर्ड, सुरी आणि ते बनवण्यासाठी वापरण्यात येणारी पातेली वा भांडी धुवून घ्यावी.

मांस धरलेले हात हे कपड्यांना किंवा अॅप्रनला पण पुसू नका. साबण आणि गरम पाण्याने स्वताचे हात नीट धुवावे. असे केल्याने तुम्हाला जीवाणूंचा संसर्ग होणार नाही आणि या धोक्यापासून वाचू शकता.