“चल लग्नाआधी एकत्र राहूया…!” जबरदस्ती करत होता बॉयफ्रेंड, पण पुढे जे झालं ते पाहून दंग व्हाल…

लाईफ स्टाइल

मोठ्या शहरात नोकरीसाठी आलेल्या एका छोट्या शहरातील तरुणीची आणि तिची ओळख करून देणार्‍या आणि तिला जाणून घेणाऱ्या एका मोठ्या शहरा मधला तरुणाची ही कथा आहे. डॉक्टरांच्या तपासणी झाल्यावर अतिदक्षता विभागात संपूर्ण शांतता पसरलेली होती आणि अशा या वातावरणामध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या सारख्या उपकरणांवर अवलंबून असलेला एक तरुण बेडवर पडून मृ’त्यू’शी झुं’जत होता. त्यावेळेस त्या तणावपूर्ण वातावरणामधे त्या ठिकाणी कामावर असलेली एक वृद्ध परिचारिका काही केसपेपर काढण्याचे काम करत होती.

तेवढ्यात, अतिदक्षता विभागात कमी प्रकाशात, मोबाईल फोन गुंजत होता. दुसर्‍या क्षणात त्या दिशेला कानोसा घेऊन सरकत त्या दिशेला हातात असणारा पॅड पकडून प’लं’ग जवळ घाईघाईने जाऊन त्या नर्स ने तो फोन उचलला. डॉक्टरांनी गं’भी’र असलेल्या पेशंटच्या घरच्यांना व कुटुंबीयांना वेळोवेळी फोनवर बोलण्याची आणि त्याच्याबद्दल चौकशी करण्याची परवानगी दिली होती.

तीस ते बत्तीस वयोगटातील त्या तरुणाला ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे दोन-तीन दिवसांपूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला अतिदक्षता विभागामधे जरी ठेवले असले तरी त्याची प्रकृती ही दिवसेंदिवस अजूनच खराब होत होती. त्या परीचारिकेने तो मोबाईल उचलला आणि रुग्णाला फोन देण्यास नकार दिला. परंतु त्यावेळी एक तरुणी फोनवर फक्त पाच मिनिटे बोलून देण्यासाठी अक्षरशः विनवत होती.

ती तरुणी म्हणत होती की जर मी आता नाही बोलले तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. यानंतर नर्स ने थोडा विचार केला आणि मोबाईल स्पीकरवर टाकून त्या तरुणीला बोलू दिले. मग ती तरुणी म्हणू लागली, “अरे मंदार, अखेरचा निरोप द्यायला तरी येशील ना असा मेसेज मला टाकायला तुला काहीच कसं नाही रे वाटल.” मी गेल्या कितीतरी दिवसापासून तुझ्या कॉल व मेसेज ला काहीच रिप्लाय देत न्हवते हे मला मान्य आहे.

कधी तुझ्या जिवलग मैत्रीच्या प्रेमात पडलो ते कळलंच नाही पण जसं जसं मन जवळ येत गेलं तसतसं तुला माझ्या भावना कळल्या नाहीत. ती तरुणी खिन्नपणे सांगत होती, “मी एका छोट्या शहरातून आली आहे आणि नोकरीच्या पहिल्याच दिवशी तुझ्या कंपनीच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये मॉडेल कल्चर पाहून मला आश्चर्य वाटले, घाबरले होते मी.

माझे असे कुटुंब आहे जे रविवारी सुद्धा कॅलेंडर बघून एकादशी चतुर्थी नाही याची खात्री करूनच नॉनव्हेज करतात. पण तू माझी काळजी पहिल्या दिवसापासून घेतलीस, मला तु आधार दिलास, तू मला तिथे खूप काही शिकायला मिळाले.त्या शिवाय तो खूप मोठा अनपेक्षित धक्का होता कि त्या दिवशी तू माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये असण्याचा आणि राहण्याचा हट्ट करत होतास. आणि घरच्यांना विश्वासात घेऊन लग्न करण्याबाबत बोलू असे मला वाटत होते.

पण काहीतरी वेगळच तुझ्या मनात मात्र सुरू असल्याचे मला जाणवले, आपण एक-दोन वर्षं एकत्र राहू , पटलं तर ठीक नाहीतर वेगळे होऊ. जर आपले जमल तर नंतर मग आपण कोर्ट मॅरेज करू. तू अस बोलून, माझ्या मनाला खूप दुखावलं आहे असं ती तरुणी सांगत होती. मुलीने पुढे सांगितले की, लग्न न करता एकत्र राहण जर , पटत नसेल तर त्यांना एकमेकांपासून दूर जाणे योग्य आहे, वेगळे होणे ठीक आहे, अरे मी ज्या लोकांमधून आले आहे ना तिथे या सगळ्या गोष्टीना मान्यता नाही.

आपली आजची पिढी जे स्वतंत्र मिळाले आहे त्या मिळालेल्या स्वातंत्र्याचा जरा जास्तच गैरफायदा घेत आहे, असे वाटत नाही का तुला? प्रेमविवाह ठीक आहे त्याला अखेर मान्य तरी केले जाते पण मला बिना लग्नाच एकत्र राहणे पटत सुद्धा नाही. तसेच असही म्हणावं लागेल कि मंदारबद्दल त्या मुलीचा खूप भ्रमनिरास झाला होता.

ती मुलगी जरा थांबली आणि म्हणाली, अजून “उशीर झालेला नाही. मी तुझ्या हाकेला उत्तर द्यायला तयार आहे.” मला वाटते की मी यावेळी जे काही बोलले ते तुला नक्की समजले आहे. शेवटी फोनवर बोलत असताना ती मुलगी रडायला लागली आणि फोन धरलेल्या नर्स म्हणाल्या की ती मुलगी बरोबर बोलत आहे. आजकाल असा जोडीदार भेटायला भाग्य लागते.

आज मंदार दवाखान्यातून ठीक होऊन घरी आला होता, ती मुलगी त्याचे स्वागत करण्यासाठी दारातच उभी होती.नर्स त्या मुलीला पाहून म्हणाली, आम्ही याच्या शरीरात असणाऱ्या व्हायरस चा सर्वनाश केला आहे,आता तो एक पेशंट म्हणून निगेटिव्ह झाला आहे पण सप्तपदी साठी मात्र हा पोसिटिव आहे. शिवाय काळजी घे,” असे ती म्हणाली आणि निघून गेली.