केदारनाथच्या बंध दरवाजातून आला रहस्यमयी साधू… ही चमत्कारिक घटना लोकं बागतच राहिलीत… 105 वर्षा पूर्वीचा साधू…

आध्यात्मिक

आज भारतात अनेक चमत्कारिक मंदिरे असल्याचे आपण याआधी सुद्धा बघितलेले किंवा वाचलेले आहे. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध आणि नवजलेल्या मंदिरांपैकी एक मंदिर म्हणजेच उत्तराखंडचे केदारनाथ मंदिर हे आहे. हे मंदिर पांडवांनी भगवान शंकराच्या पूजेच्या वेळी बांधले होते असे सुद्धा म्हणले जाते.

केदारनाथची ही चमत्कारिक घटना म्हणजे नेमकी काय आहे?

तर ही घटना साधारण 100 एक वर्षांपूर्वी घडली होती. आपल्या गरीब आर्थिक परिस्थितीशी झुंजत असलेला एक शिवभक्त हा पायीच चालत चालत केदारनाथ बाबाच्या दर्शनासाठी उत्तराखंड याठिकाणी पोहोचला होता. खरे तर ते एक सच्चे शिवभक्त होते म्हणून त्यांनी केदारनाथला दोन महिने चालत अखंड प्रवास केला.

ज्यावेळेस तो भाविक केदारनाथच्या दारात पोहचला होता त्याच वेळेस त्याला त्या मंदिराचे पुजारी मंदिराचे दरवाजे बंद करत असल्याचे दिसले. केदारनाथ बाबाचे दर्शन घ्यायचे आहे असे सांगून भक्त धावत त्या ठिकाणी निघून गेला पण मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्यांना असे सांगितले की, वातावरणातील बदलामुळे मंदिराचे दरवाजे हे आतापासून ते पुढील 6 महिन्यांपर्यंत बंद केले गेले आहेत आणि ते आता पुन्हा उघडता येणार नाहीत,

आता हे दरवाजे थेट सहा महिन्यांनंतर च उघडतील. काहीच मार्ग सापडत नसताना तो गरीब भक्त तिथेच बसला आणि त्या ठिकाणीच बसून राहून या मंदिराचे दर्शन घेतल्याशिवाय परतणार नाही असा ठाम निश्चय त्याने केला. ते आपल्या शब्दावर आणि निर्णयावर टिकून राहिले आणि संध्याकाळ होईपर्यंत मंदिराच्या सभोवती शांतता पसरली.

बर्फवृष्टी सुरू झाली होती आणि सोबतच मंदिराचे दरवाजे देखील बंद झाले होते. थंडी आणि भुकेने तो थरथर कापत होता आणि तेवढ्यात शरीरावर राख लागलेली असलेला एक साधू त्या ठिकाणी पोहोचला. तो भक्तापर्यंत पोहोचला आणि त्याने त्याला जेवायला सुद्धा दिले.

त्या नंतर त्या भक्ताने त्याला आपली सर्व हकीकत सांगितली, त्यानंतर साधू म्हणाले की यात काळजी करण्याची गरज नाही, तुम्ही इथेच झोपा तोपर्यंत मंदिराचे दरवाजे उघडतील. आणि त्यांनतर जेव्हा तो भक्त परत उठला तेव्हा त्याला दिसले की सर्वत्र त्याच्या आजूबाजूला उष्णता असल्याच त्याला जाणवत होती आणि काही साधू देखील मंदिराचे दरवाजे उघडत होते.

त्यानंतर त्या भक्ताने पुजाऱ्यांना सांगितले की, तुम्ही सांगितले होते की हे मंदिर ६ महिन्यांनंतर उघडेल, तरी मग तूम्ही आज या मंदिराचे दार का उघडत आहात? तर पुजारी म्हणाले, तुम्ही असे मुर्खासारखे कसे बोलत आहात, आज एप्रिल महिन्यातील अक्षय्य तृतीयेचा दिवस आहे! त्यानंतर त्या भाविकाने त्याच्या शेवटच्या रात्रीचा सर्व प्रसंग तिथे असणाऱ्या पुजाऱ्यांसमोर मांडला.

त्या भक्ताने सांगितले की मी या ठिकाणी काल रात्रीच झोपलो आणि आज पुन्हा जाग आली तेव्हा अक्षय्य तृतीयेचा दिवस आला आहे. सगळ्यात आधी तर त्या पुजार्‍यांचा त्याच्यावर अजिबात विश्वास बसला नाही, पण नंतर त्यांना वाटले की हा जर खोटे बोलत असेल तर ६ महिने इतक्या मोठ्या हिमवर्षावात अन्नपाण्याशिवाय हा कसा काय जगू शकतो.

अखेर या साऱ्या घटनाक्रमाने सगळ्यांनाच अगदीच वेगळ्या पद्धतीने धक्का दिला होता, ही केदार बाबा यांचीच कृपा आहे, आणि तरच असा चमत्कार घडू शकतो, असे तेथील पुजाऱ्यांचे म्हणणे आहे.