कुंभ , कन्या आणि तूळ या राशीवाल्यानी करा हा एक उपाय त्यांना मनासारखा पैसे मिळेल आणि कायम टिकून राहील

राशी भविष्य

आपल्या जीवनात ज्या गोष्टी घडत असतात त्यांला कारणीभूत आपल्या राशी असतात. आपल्या जीवनामध्ये राशीला खुप महत्व आहे. या राशी वरूनच प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व ठरलेले असते. आपले हुबेहूब वर्णन कोणत्याही व्यक्ती करू शकतो. हा आपल्या जीवनात इतका प्रभाव या राशीच्या ग्रहमानाचा होत असतो.

यामध्ये प्रामुख्याने तुळ, कन्या आणि कुंभ या राशीच्या लोकांनी जर काही उपाय केल्यास त्याच्याकडे पैसा आकर्षित होईल.
आजकालच्या धावत्या काळात आपल्याला सर्वजण पैशाच्या मागे जाताना दिसत आहेत. त्यामुळे सर्वांनाच पैशाची गरज असते आणि असलीच पाहिजे. पैसा हे विनिमयचे साधन झाले आहे म्हणूनच आनंदी जीवनासाठी पुरेसे पैसे आपल्याकडे असणे गरजेचे आहे.

परंतु राशीशास्त्रनुसार या राशीसंबंधी काही खास असे उपाय सांगितले आहेत की त्यामुळे या राशीच्या लोकांकडे कधीच पैशाची कमी भासणार नाही. काही उपाय तुळ, कन्या आणि कुंभ या राशीसाठी सांगितले आहेत. ज्यामुळे पैशाची समस्या नष्ट होईल. तुळ राशीतील लोकांसाठीचे उपाय:- या राशीतील व्यक्ती नेहमी पैशाच्या कमतरतेमुळे चिंतेत असतात असे बोलले जाते.

यावर उपाय म्हणून या लोकांनी मंगळवार आणि शनिवारी या दोन्ही दिवशी हा उपाय करावा. असे केल्याने त्याची स-मस्या दूर होईल. मंगळवार आणि शनिवारी सकाळी लवकर उठून, या राशीच्या लोकांनी पिंपळाच्या झाडावरुन त्याची 11 संपूर्ण पाने काढवीत आणि ती स्वच्छ धुवून घ्यावीत.

त्यानंतर या 11 पानांवर कुंकू, अष्टगंध किंवा चंदन वापरून श्री राम यांचे नाव लिहावे तसेच हनुमान चालीसाचा जप पण करावा. आपल्या जवळच्या कोणत्याही हनुमान मंदिरात जाऊन भगवान बजरंगबलीला तो 11 पानांचा हार अर्पण करावी. असे सलग सात मंगळवार किंवा सात शनिवारी हा उपाय आपण केल्यास तुळ राशीच्या लोकांच्या पैशाशी सं-बंधित सर्व समस्या नष्ट होतात.

कुंभ राशी साठी उपाय:- हा उपाय करण्यासाठी या राशीच्या लोकांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची संयुक्तपणे उपासना करावी, तसेच त्यांची आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्यासाठी रात्रभर जागर करावे,.तसेच, त्यानी मोहरीच तेल असलेला मातीचा दिवा सात शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली लावला तर त्यामुळे त्याच्यावर सर्व देवी-देवताचा आशीर्वाद प्राप्त होतील.

प्रत्येक शनिवारी शनीदेव बरोबर पिंपळाच्या झाडाची पण विशेष पूजा करायला हवी. पिंपळाच्या झाडाला पाणी वाहून परिक्रमा करावी. शनिदेवाला तेल चढवताना तेल कुठेही सांडला नही पाहिजे याच ध्यान ठेवले पाहिजे. शनिवरी काळे तिळाच दान करावे. कन्या राशी साठी उपाय:- पैशा सं-बंधित कोणतीही समस्या दूर करण्यासाठी या राशीच्या लोकांना एक तांत्रिक उपाय सांगितला जातो.

रविवारीच्या दिवशी हा उपाय या राशीच्या लोकांनी केल्यास अधिक लाभदायक ठरतो.यासाठी या लोकांनी रविवारी झोपेच्या आधी एक दुधाचा ग्लास आपल्या उशाजवळ ठेवावे. हा दूधाने भरलेले ग्लास सकाळी लवकर उठल्यानंतर बाभळीच्या झाडाच्या मुळामध्ये ओतुन द्यावा. किमान 5 रविवारी हा तांत्रिक उपाय केल्यास या राशीच्या लोकांच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होईल.

आर्थिक परिस्थिती सुधारते, धन, आरोग्य, संपत्ती संदर्भात सर्व चिंता मिटेल. कन्या राशीचा गृह बुध आहे,विष्णू चा अवतार भगवान श्रीमन नारायण बुध गृह चे मालिक आहेत म्हणून कन्या राशीवाल्यानी चांगल्या भाग्यासाठी भगवान श्रीमनारायणाची पूजा करावी.