कुंभमेळ्यानंतर नागा साधू कुठे गायब होतात आणि ते त्यांनतर नेमके काय करतात, हे जाणून घेतले तर तुम्हीही तुमचे भान हरपून बसाल….

जरा हटके

भारतातील धार्मिक गोष्टींचे महत्त्व हे आपल्याला चांगलेच माहीत आहे, अनेक सण येथे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. तसेच कुंभमेळा हा भारतीयांसाठी एक उत्सव प्रमाणेच असतो आणि तसेच या वर्षीचा कुंभमेळा हा हरिद्वार येथे आयोजित केला गेला होता, ज्यामध्ये 11 फेब्रुवारी आणि 16 फेब्रुवारी रोजी अनेक मोठ्या ठिकाणांची तयारी करण्यात आली होती..

आणि देशभरातून लाखोच्या संख्येने भाविक यासाठी सहभागी झाले होते, परदेशातून सुद्धा अनेक लोक या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी नेहमी येतच असतात. पण कोरोना संकटामुळे अनेक परदेशी भाविक भक्त हे या मेळाव्यापासून दूर राहिले होते. मात्र, या कुंभमेळ्याचे खास आकर्षण असते ते म्हणजे नागा साधू, कारण ते एका वेगळ्याच पद्धतीने या मधे सहभागी होत असतात.

त्यामुळे सर्वांनाच याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता ही नेहमीच राहिलेली आहे, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की कुंभमेळ्यानंतर हे नागा साधू नेमके कुठे जातात किंवा ते काय करत असतात? त्यांचे राहणीमान काय आहे अशा या प्रश्नाचे उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. कोरोनामुळे या कुंभमेळ्यात नागा साधू अल्पसंख्येने सहभागी झाले होते.

अर्धकुंभ, महाकुंभात नागा साधू मोठ्या संख्येने दिसतात. तसेच, मी तुम्हाला सांगू इच्छितो की नागा साधू बनण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि त्याचे धार्मिक महत्त्वही खूप जास्त आहे. जर एखाद्या व्यक्तीला नागा साधू बनायचे असेल तर त्याला आधी नागा आखाड्यात जावे लागत असते. या सर्वांनंतर त्या आखाड्या मधे एक साधू होण्यासाठी आवश्यक असणारी संपूर्ण माहिती आणि

त्याबद्दल आवश्यक असलेले सर्व ज्ञान दिले जाते आणि त्यांनतर त्या ठिकाणी त्यांची एक अध्यात्मिक परीक्षा घेतली जात असते, ज्यमढेवकी त्यांची देवांबद्दल असलेली श्रद्धा आणि धार्मिक बाबतीतले त्यांचे ज्ञान हे माहीत केले जाते. तसेच या सगळ्यात ब्रह्मचर्य, वैराग्य, धर्म इत्यादींची दीक्षा दिली जात असते आणि ही दीक्षा घेण्यासाठी चा कालावधी हा साधारणतः सहा ते सोळा वर्षांचा असू शकतो

तसेच त्यांच्याकडून ही दीक्षा घेतल्यानंतर त्याचे मुंडण देखील केले जाते आणि त्यानंतर त्याच्याकडून पिंडदान सुद्धा करून घेतले जाते आणि हे पिंडदान दान करण्या चा अर्थ म्हणजे आपल्या सर्व नातेवाइकांच्या नावाने पिंडदान देऊन त्याच्याशी असलेले सर्व नातेसंबंध संपवावे लागतात, म्हणजे या सर्व नातेसंबंधांवर पाणी सोडावे लागते. आणि म्हणजेच, त्या सर्व व्यक्ती ह्या त्या साधूसाठी मृत आहेत असा त्याचा अर्थ होतो.

त्याच बरोबर आपल्या बऱ्याचवेळा ही गोष्ट नजरेत येते की हे नागा साधू त्यांच्या अंगाला भस्म लावत असतात आणि ते भस्म हे बाकी काही नसून मृत व्यक्तींची राख असते आणि अश्या मेलेल्या व्यक्तींची च राख ते त्यांच्या शरीराला लावत असतात. त्याच प्रमाणे ज्यावेळी हा कुंभमेळा संपतो त्यावेळी हा कुंभमेळा संपल्यानंतर नागा साधू हे हिमालय, कशी आणि गुजरात तसेच आसाम या सारख्या काही पहाडी भागांमधे राहायला जात असतात.

स्वतःला एकांत मिळण्यासाठी हे सर्व साधू एखाद्या डोंगरामध्ये एक गुफा करून राहत असतात. तसेच, मिला संपल्यानंतर अनेक साधू हे जंगलात फिरत असतात, अनेक त्यांना जंगलात काहीच आणि कशाचीही अजिबात भीती वाटत नाही. त्याचं शरीर आणि मन हे अतिशय जास्त बळकट झालेले असते. असे म्हटले जाते की ते तेथे सर्व गोष्टींवर मात करू शकण्यास सज्ज असतात.

तसेच नागा साधू हे दिवसातून फक्त एकदाच खातात म्हणजे जेवण करत असतात आणि दिवसातून फक्त तीन वेळा ते पाणी पित असतात आणि नागा साधूचे जीवन हे विविध रहस्यांनी भरलेले असते आणि त्यामुळे अनेकांनी त्यांच्या जीवनावर आधारित अनेक संशोधन केले आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्यावर त्यांनी अनेक लघु आणि दीर्घ चित्रपट सुद्धा काढले आहेत.

तसेच, जर तुम्हाला वर दिला गेलेला हा लेख आणि त्यातील माहिती आवडली असेल, तर तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत हा लेख जरूर शेअर करा आणि तुम्हाला सुद्धा हा लेख कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला अवश्य कळवा.