एअर होस्टेस विमान प्रवासात काय करतात ते पहा.. त्या देखील तुमच्या नकळत ही असली कामे करत असतात…!

लाईफ स्टाइल

विमान प्रवास हा प्रत्येकाचाच आवडता प्रवास असतो. फ्लाइट अटेंडंट तसेच मुख्य एअर होस्टेस ह्या त्या विमानातील प्रवाशांना विशेष सेवा देत असतात. ग्राहकांना त्या एअर होस्टेस कडून काय हवे आहे ते फक्त 3 सेकंदात त्यांना समजत असते. फ्लाइट अटेंडंट आणि एअर होस्टेसबद्दल काही अतिशय मनोरंजक आणि गुप्त अशा गोष्टी आहेत ज्या बहुतेक लोकांना माहितच नाही आहेत.

जेव्हा पण तुम्ही विमानाने प्रवास करण्यासाठी त्यामधे चढत असतात त्यावेळी एअर होस्टेस नेहमीच हसत हसत तुमचे स्वागत करत असल्याचे तुम्हाला दिसत असते कारण ती फक्त लोकांना अभिवादन करण्यासाठीच नाही तर लोकांचा प्रवास आनंददायी करण्यासाठी देखील तिथे उभी असते, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारची भीती वाटू नये. तसेच एअर होस्टेसच्या झोपण्याच्या जागेबद्दल कोणालाच माहिती नाही.

लांब पल्ल्याच्या फ्लाइटमध्ये बरेच प्रवासी झोपी जात असतात परंतु फ्लाइट अटेंडंट किंवा एअर होस्टेस ह्या कुठे झोपतात हे मात्र कुणालाच समजत नाही. काही वेळा एकटी एअर होस्टेस लांब अंतराच्या प्रवासामध्ये सतत दिसत नाही कारण ती अनेकदा तिच्या शिफ्ट बदलत असते. एअर होस्टेस सहसा विमानाच्या गॅलरीच्या वर असलेल्या भागात किंवा खाली तळावर झोपतात. एअर होस्टेस विमानाच्या बाथरूमकडे नेहमी बारीक लक्ष देत असतात.

कारण त्यात एकाच वेळी 2 लोक जाताना दिसले तर त्यांना थांबण्याचे प्रशिक्षण दिले जाते. एअर होस्टेस नेहमी मोबाईल फोन वापरत असतात. मात्र त्या प्रवाशांना मोबाईल फोन वापरू नका असेच नेहमी सांगत असल्याचे आपल्याला दिसत असते. विमानात बराच वेळ असल्याने ते मोफत वायफायवर त्यांचा फोन वापरत असतात. विमानात एखादा प्रवासी गैरवर्तन करत असेल तर एअर होस्टेसला त्याला कसे सामोरे जायचे याचे प्रशिक्षण दिले गेलेले असते.

ते अशा व्यक्तीचे हात झिप टायने बांधू देखील शकत असतात. एअर होस्टेस कोणत्याही प्रवाशाशी संभाषण वाढवू शकते आणि ते त्यांच्यापुरते मर्यादित ठेवलेले नाही आहे. जेव्हा तुम्ही उड्डाण करता तेव्हा एअर होस्टेस तुमचे स्वागत करण्यासाठी उभी असते, परंतु ज्या व्यक्तीला काही समस्या उद्भवू शकतात किंवा ज्या लोकांना त्रास होणार नाही, अशा व्यक्ती ह्या त्यांना स्वागत करतानाच समजून गेलेल्या असतात.

तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी कोणाकडे वळावे किंवा कोणाला विचारावे हे देखील त्यांना व्यवस्थित समजत असते. एअर होस्टेसला पगार हा काही जास्त मिळत नाही. लोकांना वाटते की फ्लाइट अटेंडंटचे पगार जास्त आहेत. एअर होस्टेसचा पगार हा त्या विमानात त्या जेवढा वेळ असतात त्या तेवढ्याच वेळेचा असतो. विमानात जास्त दारू पिणे हानिकारक आहे.

अतिमद्यपान केल्याबद्दल तुम्ही पुढच्या विमानतळावर उतरल्यावरच एअर होस्टेसला तुम्हाला तुरुंगात टाकण्याचा अधिकार आहे. विमानात कॉफी किंवा चहाची ऑर्डर देऊ नका कारण विमानातील गरम पाण्याची टाकी अनेक वर्षांपासून फारशी स्वच्छ केली गेलेली नसते. आणखी एक अत्यंत आवश्यक असलेली गोष्ट म्हणजे अशी आहे की गरम पाणी आणि स्नानगृह पाईप्स हे एकमेकांच्या अगदी जवळजवळ बांधले गेलेले असतात.

आणि ज्यावेळी विमानात प्रवास करताना ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागते, त्यावेळी लोकांना त्या ठिकाणी श्वास घेण्या साठी अतिशय त्रास होऊ लागलेला असतो आणि अशा वेळेस ऑक्सिजन मास्क हा खाली येतो आणि त्यानंतर प्रवासी स्वतःहून त्या ऑक्सिजन मास्क द्वारे श्वास घेऊ शकतात.

पण हे मास्क फक्त १५ मिनिटांसाठी ऑ’क्सि’जन पुरवतात आणि हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. विमानात बॉ’म्ब आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला कधीच कळणार नाही. जर तुम्ही विमानात प्रवास करत असताना विमानाच्या पायलटला बॉम्बची सूचना मिळाली, तर फ्लाइट अटेंडंट प्रवाशांना याबद्दल सांगणार नाही कारण ते घाबरतील, म्हणून ह्या सर्व गोष्टी गुप्त ठेवल्या जात असतात.

त्यांची परीक्षा देखील खूप कठीण असते आणि पात्र उमेदवारासाठी अनेक अटी सुद्धा त्यामधे असतात. त्यांना जेवढा वेळ त्या काम करतात त्या तासाचे पैसे दिले जात असतात आणि तुम्ही फ्लाइटमध्ये जाताना ते हसत दारात उभे असतात. ते तुमचे स्वागत करत आहेत असे तुम्हाला वाटते. मात्र प्रत्यक्षात हा पाठी ठेवून ते बोटांवर सर्व प्रवासी संख्या मोजत असतात.