आजीवन ब्रह्मचारी असूनही महर्षी वात्स्यायन यांनी ‘का-म-सूत्र’ सारखा महान ग्रंथ हा लिहलाच कसा ? नक्कीच बघा..

लाईफ स्टाइल

काम-सुत्र…. फक्त उच्चार जरी केला तरी कान टवकारले जातात. आजच्या काळात टिव्ही आणि चित्रपटाच्या माध्यमातून काम-सुत्रावर भाष्य केले जाते पण मोकळेपणाने चर्चेला येणारा हा विषय नाही. कुटुंबामध्ये तर आजही काम-सुत्र विषयावर बोलले जात नाही. काम-सुत्र ग्रंथ तिसऱ्या शतकात लिहिला गेला पण आजही त्याबद्दल लपवूनच चर्चा केली जाते.

काम-सूत्र हा शब्द उच्चारताच बऱ्याचदा या ग्रंथामध्ये केवळ लैं’गिक सुखाशी निग’डित ज्ञान आणि मुद्रा यांचा समावेश असेल असा गै’रसमज निर्माण होतो, मात्र असे नाही. काम-सूत्र ग्रंथात लैं’गिक सुख हा पाया ठेवून आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने मनुष्याने परिपूर्ण आनंद आणि समाधान कसा मिळवावा याबद्दल भाष्य केले आहे. काम-सुत्र ग्रंथ ऋषी वात्स्यायन यांनी लिहिला आहे.

स्वतः अविवाहीत आणि संन्यासी असणाऱ्या वा’त्स्या’यन यांनी जगाला काम-सुत्राचे धडे दिले. काम-सूत्र हा ग्रंथ केवळ प्रणय सुखाशी निग’डित किंवा काम’क्रिडे’बद्दल माहिती देणारा ग्रंथ नव्हता तर एकंदरीतच जीवन जगण्याची कला शिकवणारा ग्रंथ आहे. यामध्ये प्रेमाचे स्वरूप, जोडीदार कसा निवडावा, वैवा’हिक आयुष्यातील लैं’गिक आसक्ती कशी टिकवून ठेवावी याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.

आयुष्यातील आनंद हा घटक या ग्रंथांमध्ये प्रामुख्याने अधोरेखित करण्यात आला आहे. ऋषी वा’त्स्या’यन हे एका हिंदू ब्राम्हण पुजारी कुटुंबातील होते. वेद आणि अध्या’त्माचे शा’स्त्र’शुद्ध शिक्षण त्यांनी घेतलेलेच होते मात्र तरीही यामध्ये त्यांची थेट रुची नव्हती. परंतू इच्छा, सुख मिळणे किंवा मिळवणे यामध्ये त्यांना खुपच रस होता. याविषयीचा सखोल अभ्यास करताना ऋषींच्या असे लक्षात आले की,

इच्छा, इच्छापूर्ती होताना मिळणारा आनंद आणि परमोच्च बिंदू अर्थातच परमा’नंद ही देवानेच मानवाला दिलेली एक अद्भुत अशी देणगी आहे. अध्या’त्माच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास स्वर्ग’प्राप्तीकडे जाण्याचा एक मा’र्ग अर्थातच स्वर्ग’सूख. मग यासाठी देवाने मानवी शरी’राची जडणघडण करतानाच स्त्री आणि पुरुष देहांना हे स्वर्गसूख मिळेल अशी व्यवस्था केली आहे,

याकडे ऋषी वात्स्यायन यांचे लक्ष वेधले गेले व याविषयीचे आणखी सखोल ज्ञान प्राप्त करण्यास त्यांनी सुरुवात केली. लैं’गि’कता या विषयाला त्यांनी अनेक नवे आणि सुंदर आयाम दिले आहेत. बनारसमध्ये प्रदीर्घ काळ घालवलेले वात्स्यायन ऋषी हे चार वेदांचे जाणकार आणि तत्त्वज्ञानी मानले जातात. काम-सूत्रामध्ये गुप्त वंशाचा उल्लेख नाही त्यामुळे काम-सूत्र हे गुप्त वंशाच्या अगोदर लिहिण्यात आले असावे असा कयास मांडला जातो.

मात्र इतिहासकारांच्या मते वात्स्यायन म्हणजेच आचार्य चाणक्य यांचे प्रमुख शिष्य कामंदक होते. तर काही ठिकाणी त्यांचा उल्लेख वात्स्यायन मल्लनाग असा करण्यात आला आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार कर्तव्यांमधून जाणे-येणे प्रत्येक मनुष्याला क्रम-प्राप्त असते. यापैकी काम या जबाबदारीने आयुष्यातील आनंददायी क्षणांचा उप’भो’ग घेता येऊ शकतो.

त्याबद्दल मोकळेपणाने समाजामध्ये बोलले जावे हा सका’रात्म’क विचार रुजविण्यासाठी वात्स्यायन यांनी काम-सुत्र ग्रंथाची निर्मिती केली. प्रत्येक राजाला या पुस्तकाची एक प्रत ते भेट करत होते. राजा सुखी असेल तर तो शांतपणे सगळे प्रजेच्या सुखसंदर्भात निर्णय घेईल हाच त्यामागचा विचार होता. एका शास्त्रीय पद्धतीने गृहस्थ जीवनात कामधर्म कसा गरजेचा आणि महत्त्वाचा आहे याचे विवेचन वात्स्यायन यांनी केले म्हणूनच त्यांचा सन्मान केला जातो.

जे जोडपे लैं’गिक आयुष्यात सुखी, त्यांचा संसार सुखाचा तसेच व्याधी’विरहीत दिर्घायुष्य त्यांना प्राप्त होते असे म्हणतात. हेच ऋषी वात्स्यायनांनी अभ्यासातून सिद्ध केले की, दोन शरी’रांचे मि’लन झाले की जे सुख दोघांनाही प्राप्त होते ती केवळ इच्छापूर्ती नाही, तर ब्रम्हानंद म्हणजेच तो मानवी देह परमेश्वराशी एकरुप होतो असे आहे. परमानंद हा फक्त देहाच्या काम’तृप्ती’तून मिळतो असे नाही तर

नृत्य, संगीत, वादन, अभिनय, चित्रकला अशा सर्व अभिव्यक्तींमधूनही मिळतो. हे सुद्धा वात्स्यायन ऋषींनी काम-सुत्रात लिहीलेले आहे. काम-सुत्र ग्रंथ संस्कृत भाषेत असून गृहस्थाश्रमी स्त्री-पुरुषांची जीवनयात्रा सुखमय व्हावी यासाठी या ग्रंथांचा अवतार झालाय. काम-सूत्र हा ग्रंथ भारतीय भाषा आणि परदेशी भाषांमध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या स्वरूपात भाषांतरित झाला.

मध्यप्रदेश मधील खजुराहो येथील शिल्प सुद्धा काम-सूत्र वर आधारित आहे. काम-सुत्राकडे शास्त्रीय पद्धतीनेच पहावे ही महर्षी वात्स्यायन यांची अपेक्षा होती. अगदी सुरुवातीच्या काळात काम-सुत्राचा पवित्र असा उल्लेख केला जातो मात्र त्यानंतर ती पवित्रता कुठेतरी हरवली अशी खंत ही व्यक्त केली जाते.