अवघ्या २४ तासात काढा यकृतातील सर्व घाण / प्रत्येक आजारापासून करा स्वतःचा बचाव…!

आरोग्य

आजच्या धकाधकीच्या जीवनात शरीर निरो’गी ठेवणे हे कुठल्याही मोठ्या आव्हानापेक्षा काही कमी नाही. विशेषत: जेव्हा शरीर डिटॉक्स करण्याचा विचार येतो तेव्हा लोक सहसा गोंधळात पडतात. आपले शरीर डीटॉक्स कसे करायचे याबद्दल बऱ्याच लोकांना योग्य ती माहिती नसते. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा आहे.

शरीराच्या एका भागात समस्या असल्यास अनेकांवर त्याचा परिणाम होतो. जसे की आपले यकृत. यकृत हे आपल्या शरीरातील विषारी रसायने काढून टाकण्यास आपल्या शरीराला अतिशय जास्त मदत करते. त्या सोबतच यकृत हे पित्त उत्सर्जित करून एन्झाईम्स पुन्हा सक्रिय करण्यास देखील मदत करते.

याशिवाय यकृत अनेक खनिजे आणि लोह साठवून शरीर निरो’गी ठेवण्यास मदत करते. जेव्हा यकृताची खूप कार्ये असतात, तेव्हा ते निरो’गी ठेवणे देखील खूप महत्वाचे आहे. यामुळेच आजकाल प्रत्येकजण लिव्हर डिटॉक्सची चर्चा करत आहे. असे मानले जाते की यकृत अनेक पदार्थ डिटॉक्सिफाय करून ते शरीरातून हानिकारक पदार्थ बाहेर टाकते.

हेच कारण आहे की आज बाजारात यकृत डिटॉक्स करण्यासाठी अनेक प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. बाजारात मिळणारी उत्पादने यकृत स्वच्छ करण्याचा दावा करतात, परंतु त्यात किती तथ्य आहे याचा कोणताही शास्त्रीय पुरावा आजपर्यंत सापडलेला नाही.

म्हणूनच यकृत डिटॉक्स करण्यासाठी, बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही औषधाचा किंवा उत्पादनाचा अवलंब न करता, घरगुती वस्तूंचे सेवन करणे आवश्यक आहे. घरगुती गोष्टी नैसर्गिक असतात त्यामुळे शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. चला तर मग आज जाणून घेऊया लिव्हर डिटॉक्स करण्याविषयी.

यकृत डिटॉक्स करण्याची गरज कधी असते? यकृत डिटॉक्स करण्यापूर्वी, शरीराला त्याची गरज कधी असते हे समजून घेणे आवश्यक आहे. थोडेसे काम केल्यावर थकवा जाणवणे, त्वचेचा रंग अचानक पणे बदलणे, वारंवार, सतत कशाची तरी ऍलर्जी होणे, छातीत जळजळ होणे, जर आपल्या शरीराला खाल्लेलं अन्न व्यवस्थित लागत नसल्यास यकृत नीट काम करत नाही असे म्हणतात आणि अशा वेळेस शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करणे महत्वाचे आहे असे समजले जाते.

यकृत डिटॉक्ससाठी घरगुती उपाय:-

हळदीचे पाणी – भारतीय घरांच्या जेवणात सहजच हळदीचा वापर केला जात असतो, असे एकही घर नाही जिथे याचा वापर होत नाही आणि हे जवळजवळ अशक्यच आहे. हळद हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. ज्या लोकांना यकृताशी संबंधित समस्या आहेत त्यांना दररोज हळदीचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. हळदीचे पाणी शरीरातील एंजाइम वाढवण्याचे काम करते. हे अन्नासह पोटात गेलेले विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.

हळदीचे पाणी कधी सेवन करावे – यकृत निरो’गी ठेवण्यासाठी तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी हळदीच्या पाण्याचे सेवन करू शकता. हळदीचे पाणी बनवण्यासाठी एका ग्लास पाण्यात कच्च्या हळदीचा एक छोटा तुकडा टाकून उकळून घ्या. आणि हे उकळलेले पाणी कोमट झाल्यानंतर त्याचे सेवन करा.

लिंबू आणि कोमट पाणी – जेव्हा शरीरातील चरबी कमी करण्याचा विचार येतो तेव्हा लोक सहसा कोमट पाण्यात लिंबू पिळून त्या पाण्याचे सेवन करण्याची शिफारस बरेचजण करतात. लिंबू लिव्हर डिटॉक्सिफिकेशनचे काम करते. दररोज एक ग्लास लिंबू आणि कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि यकृत निरो’गी ठेवण्यास उपयुक्त ठरू शकतात.

कोमट पाण्यासोबत लिंबू कधी प्यावे – तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी कधीही कोमट पाण्यासोबत लिंबू पिऊ शकता. तज्ज्ञांच्या मते, एखाद्याने दिवसात एक ग्लास गरम पाणी आणि लिंबू यांचे सेवन करण्यापेक्षा अधिक जास्त ते पिऊ नये.

यकृत निरो’गी ठेवण्यासाठी काय करावे – जर तुम्हाला तुमचे यकृत नेहमी निरो’गी ठेवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्यात काही बदल करावे लागतील. पिझ्झा, बर्गर, नूडल्स यांसारख्या जंक फूडला बाय बाय करून तुम्ही यकृत निरो’गी ठेवू शकता आणि जेवणातील दारू, सिगारेट यासारख्या वाईट सवयी.